दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या सलामी जोडीने दमदार सुरुवात केली.
Published on
:
23 Nov 2024, 11:51 am
Updated on
:
23 Nov 2024, 11:51 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : Y Jaiswal KL Rahul IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 17 विकेट पडल्या. हा एक विक्रम ठरला. मात्र, दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 104 धावांमध्ये संपुष्टात आणला. त्यानंतर दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या सलामी जोडीने दमदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी शतकी भागीदारी केली.
दुसऱ्या डावात जैस्वाल आणि राहुल यांच्यात 172 धावांची भागीदारी झाली. दुस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दोघेही नाबाद तंबूत परतले. 20 वर्षांनंतर भारतीय सलामी जोडी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सलामी शतकी देण्यात यशस्वी ठरली आहे. यापूर्वी सिडनीमध्ये वीरेंद्र सेहवाग आणि आकाश चोप्रा यांच्यात 123 धावांची भागीदारी झाली होती.
ऑस्ट्रेलियात सहाव्यांदा भारतीय सलामीवीरांमध्ये 100 हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. विदेशी भूमीवर आपला दुसरा सामना खेळणाऱ्या यशस्वी जैस्वालला पहिल्या डावात खराब कामगिरी केली. पण दुसऱ्या डावात त्याने नाबाद 90 धावा केल्या आहेत. सलामीवीर राहुल पहिल्या डावात चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता पण तो वादग्रस्त पद्धतीने बाद झाला. त्याने पहिल्या डावात 74 चेंडूत 26 धावा केल्या, तर दुसऱ्या डावातही त्याने नाबाद अर्धशतक झळकावले आहे.
1986 नंतर पहिल्यांदाच इंग्लंड व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाच्या सलामीच्या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 150+ धावांची भागीदारी केली आहे. 1986 मध्ये सुनील गावस्कर आणि के श्रीकांत या जोडीने अशी कामगिरी केली होती. त्यानंतर त्यांनी सिडनीत 191 धावांची सलामी दिली होती. तर इंग्लंडसाठी अँड्र्यू स्ट्रॉस आणि ॲलिस्टर कुक यांनी 2010 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 159 धावांची ओपनिंग भागीदारी केली होती.