विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडतेय. सोलापूर जिल्ह्यात एकूण 184 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप 6, शिवसेना शिंदे गट 3, राष्ट्रवादी अजित पवार गट 2, काँग्रेस 4, शरद पवार 5, शिवसेना ठाकरे 3, वंचित 9, मनसे 5, माकप 1, एमआयएम 1, शेकाप 1 जागा लढत आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 38 लाख 48 हजार 869 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 19 लाख 71 हजार 831, स्त्रीया 18 लाख 76 हजार 728 तर 310 तृतीयपंथी मतदार आहेत. 2019 तुलनेत 1 लाख 92 हजार 36 मतदार वाढले आहेत. सोलापूर जिल्ह्यात एकूण 3 हजार 738 मतदान केंद्र आहेत त्यापैकी शहरात 1183 तर ग्रामीण भागात 2555 केंद्र आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 1 हजार 747 मतदान केंद्र आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पाच मतदार संघात 38 उमेदवार रिंगणात आहेत. 13 लाख 39 हजार 697 मतदार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात १९९५ नंतर पहिल्यांदा अपक्ष मोठ्या प्रमाणावर रिंगणात आहेत.