50 पैकी एकही पडला, तर गावाकडे शेती करेन:एकनाथ शिंदेंनी शब्द खरा करून दाखवला, शिवसेनेची 55 जागांवर आघाडी
3 hours ago
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकालाचे कल समोर येत असून महायुतीला 200 पेक्षा अधिक जागांवर बहुमत मिळताना दिसत आहे. या सर्व धामधुमीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना मोठा दावा केला होता. 50 मधला एकही माणूस पडू देणार नाही, भाजपच्या 115 लोकांसोबत मिळून 200 आकडा पार करणार, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. आता येत असलेले निकाल पाहता एकनाथा शिंदे यांनी आपला शब्द खरा करून दाखवला. एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये शिवसेनेत बंडखोरी केली होती. ते शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार सोबत घेऊन बाहेर पडले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे सरकार पडले होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. उद्धव ठाकरे यांच्याकडील धनुष्यबाण हे चिन्हही निवडणूक आयोगाने त्यांना दिले होते. विधानसभा निवडणुकीत बंडखोरांमधील एकही आमदार निवडून येणार नाही, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात होता. पण हा दावा आता फोल होताना दिसत आहे. नेमके काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?
त्यावेळी झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपले पहिले भाषण केले होते. आमचा 50 मधला एकही आमदार आम्ही पडू देणार नाही. तसेच भाजपचेही 115 आमदार मिळून आम्ही 200 चा आकडा पार करू. हा सभागृहात शब्द आहे आणि तसे नाही केले, तर गावाला शेती करायला जाईन, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. आता शिंदेंच्या शिवसेनेने 55 जागांवर आघाडी घेत आपला स्ट्राईक रेट वाढविला आहे. तसेच महायुतीचा आकडा 220 पेक्षा अधिक होताना दिसत आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)