JCB म्हणजे बुलडोझर, हे तुम्हाला माहिती असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, JCB ही एक अशी कंपनी आहे जी बुलडोझरसारखी अनेक माती हलवणारी आणि बांधकाम यंत्रे बणवणारी कंपनी आहे. हे अनेकांना माहिती नसतं. आज आम्ही तुम्हाला JCB चा 80 वर्षांपूर्वी प्रवास कसा सुरु झाला, याविषयीची माहिती देणार आहोत.
JCB ही भारतीय कंपनी आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम जाणून घ्या की, JCB ही ब्रिटनची कंपनी आहे. भारतात त्याचा व्यवसाय इतका मोठा आहे की, तो ब्रिटनबाहेरील सर्वात मोठा व्यवसाय आणि केंद्रांपैकी एक आहे. हे देखील तुम्हाला माहिती असावं.
80 वर्षांपूर्वी सुरु केली कंपनी
1945 मध्ये JCB कंपनी सुरू झाली. याची सुरुवात जोसेफ सिरिल बामफोर्ड यांनी केली आणि त्यांच्या नावाची पहिली अक्षरे एकत्र करून कंपनीला JCB असे नाव देण्यात आले. कंपनीने आपला व्यवसाय सुरू केला तेव्हा ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूस लावण्यासाठी एग्रीकल्चरल टिपिंग ट्रेलर, म्हणजेच ट्रॉली बनवायची. इथून कंपनीचा प्रवास सुरु झाला आणि अर्थातच पुढे भरभराटच झाली.
JCB ही कंपनी एवढ्यावरच थांबली नाही. पुढे नावीन्य पूर्ण अनेक कामं कंपनीनं केली. कंपनीने 1952 मध्ये पहिला बॅकहो लोडर बनवला. या मशिनला सर्वसामान्य लोक ‘बुलडोझर’ या नावाने ओळखतात.
JCB चा व्यवसाय किती मोठा?
1952 मध्ये JCB ने पहिला बुलडोझर बनवला आणि कंपनीने तेव्हापासून आजपर्यंत मागे वळून पाहिलं नाही. आज JCB जागतिक ब्रँड बनला आहे. कंपनीचे आज जगभरात 22 हून अधिक प्रकल्प आहेत आणि 750 हून अधिक डीलर्ससह, कंपनी सर्व प्रकारची अर्थ मूव्हिंग इक्विपमेंट टूल्स बनविण्याचे काम करते. मात्र याला बुलडोझर म्हणून ओळखले जाते आणि भारतातील त्याचे सर्वात मोठे केंद्र दिल्लीजवळील वल्लभगड येथे आहे.
भारतात अलीकडे बुलडोझर खूप लोकप्रिय झाले आहेत. आजकाल राजकारणातही बुलडोझरचा वापर केला जात आहे. उत्तर प्रदेशपाठोपाठ अनेक राज्यांत घर बांधण्यासाठी याचा वापर केला जातो.
लडोझर हे माती फिरवणारे बांधकाम यंत्र असले तरी बुलडोझर बनवण्यापूर्वी JCB काय बनवायचे, याविषयीची सर्व माहिती आम्ही तुम्हाला वर दिली आहे. आता तुम्हाला बुलडोझर आणि JCB चा फरक लक्षात आला असेल. तसेच JCB ने पहिला बुलडोझर बनवल्यापासून कंपनीचा आजपर्यंतचा प्रवासही तुमच्यासमोर आम्ही मांडलाय.