Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे वरळीमधून जिंकले आहेत. ते दुसऱ्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकले आहेत. "शिवसेनेचे वरिष्ठ नेते, युवा सेना, मित्र पक्ष सर्वांचे आभार मानतो. वरळीत विजय झाला. निष्ठावंत म्हणून सर्वांनी काम केलं"
aaditya thackerayImage Credit source: tv9 marathi
उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल शंका व्यक्त केली आहे. ते वरळीमधून उभे होते. ते दुसऱ्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकले आहेत. “शिवसेनेचे वरिष्ठ नेते, युवा सेना, मित्र पक्ष सर्वांचे आभार मानतो. वरळीत विजय झाला. निष्ठावंत म्हणून सर्वांनी काम केलं” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “तुम्हाला वाटत होते, ऑनग्राऊंड वाटत होते तसे हे अपेक्षित निकाल नाहीयत. उद्धव ठाकरे प्रेस घेणार आहेत, त्यावर बोलतील” असं आदित्य ठाकरे म्हणाले. संजय राऊत हा निकाला मानायला तयार नाहीत. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, “हे मतदान महाराष्ट्राने केलय की EVM ने? हा मोठा प्रश्न आहे. यावर आम्ही चर्चा करु. निकालाचा आढावा घेऊ, मग बोलू” लोकसभेनंतर महाराष्ट्रात विधानसभेला कुठे कमी पडलात का? यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, “हा तोच महाराष्ट्र आहे, ज्याने आम्हाला लोकसभेला आशिर्वाद दिला. महाराष्ट्रात लाट दिसत होती. पण तसं घडलं नाही”
‘हा निकाल अपेक्षित नाहीय’
“जे निकाल अपेक्षित होते तसे आले नाहीत. ईव्हीएमने किती प्रचार केला हे बघाव लागेल. काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले दिग्गज नेते पडले, त्यावर हा निकाल अपेक्षित नाहीय, म्हणून टेक्निकल चर्चा होणं गरजेच आहे” असं उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं.