Ahilyanagar Assembly Election 2024 Pudhari News network
Published on
:
23 Nov 2024, 6:58 am
Updated on
:
23 Nov 2024, 6:58 am
अहिल्यानगर : पुढारी ऑनलाइन डेस्क - विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. मतमोजणीनुसार निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. महायुतीच्या 200 हून अधिक जागा आघाडीवर आहेत. दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा पुन्हा एकदा ताब्यात ठेवण्यात महायुतीला यश मिळत असल्याचे समोर येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व 12 मतदारसंघाचे सुरुवातीच्या कलानुसार महायुतीला मोठा विजय मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी मतमोजणी सुरु आहे
अकोले- तहसील कार्यालय नवीन इमारत
संगमनेर – भाऊसाहेब संतुजी थोरात क्रीडा संकुल
शिर्डी – प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, राहाता
कोपरगाव – सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल
श्रीरामपूर – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय
नेवासा – न्यू गव्हर्न्मेंट ग्रेन गोडाऊन, मुकुंदपुरा, नेवासा फाटा
शेवगाव – शासकीय इमारत तहसील कार्यालय शेवगाव
राहुरी – रामदास पाटील धुमाळ न्यू आर्टस कॉलेज, राहुरी
पारनेर – औद्यागिक प्रशिक्षण संस्था, पारनेर
अहमदनगर शहर – वेअर हाऊस गोडाऊन एमआयडीसी, नागापूर
श्रीगोंदा – गव्हर्न्मेंट ग्रेन गोडाऊन, पेडगाव रोड
कर्जत जामखेड – दादा पाटील महाविद्यालय, कर्जत.
नगर शहर - संग्राम जगताप 20239 मतांनी आघाडीवर.
श्रीगोंदा - विक्रम पाचपुते 7351 मतांनी आघाडीवर
कर्जत जामखेड - राम शिंदे 1042 मतांनी आघाडीवर.
शेवगाव पाथर्डी - चंद्रशेखर घुले पाटील 8075 मतांनी आघाडीवर
राहुरी - शिवाजी कर्डीले 2578 मतांनी आघाडीवर
संगमनेर - अमोल खताळ 7046 मतांनी आघाडीवर
शिर्डी - राधाकृष्ण विखे 19661 मतांनी आघाडीवर.
कोपरगाव - आशुतोष काळे 43794 मतांनी आघाडीवर
नेवासे - विठ्ठल लंघे 6009 मतांनी आघाडीवर.
श्रीरामपूर - हेमंत ओगले 6870 मतांनी आघाडीवर
अकोले - अमित भांगरे 6509 मतांनी आघाडीवर
राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने नगर जिल्ह्यातच आहेत. त्याचमुळे सहकाराची पंढरी म्हणून जिल्ह्याला संपूर्ण देशात ओळखले जाते. लोकसभेचे दोन आणि विधानसभेचे बारा मतदारसंघ अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत. त्यापैकी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे दोन आमदार (लोकसभा निवडणुकीत निलेश लंके अहमदनगर दक्षिणमधून खासदार) अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे तीन आमदार, भाजपचे तीन आणि काँग्रेसचे दोन आमदार तसेच शंकरराव गडाख यांच्या रुपाने एक अपक्ष लढत देत आहेत.