Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला जागा मिळेना

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

27 Sep 2024, 7:14 am

Updated on

27 Sep 2024, 7:14 am

ठाणे : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी धावत्या गाडीतच केलेला एन्काऊंटर वादात सापडला असताना त्याचा मृतदेह कळवा रुग्णालयात अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत पडून आहे. पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात येणार आहे, अशी माहिती अक्षयच्या वडिलांचे वकील अॅड. अमित कटारन-वरे यांनी दिली. भविष्यात काही पुरावे लागले किंवा डीएनए चाचणी करावी लागली तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल. मात्र, ठाणेपाठोपाठ बदलापुरातही त्याचे अंत्यसंस्कार होवू देण्यास विरोध झाल्याने पेचप्रसंग उद्भवला असून, अक्षयचे आई- वडील, काका आणि पोलीस कर्मचारी अंत्यसंस्काराच्या जागेसाठी दफन भूमीच्या शोधात फिरत आहेत.

अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्वच ठिकाणावरून विरोध होत असल्यामुळे त्याच्या आई- वडिलांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेत अंत्यसंस्कारासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. अंत्यसंस्कार बदलापूर या ठिकाणीच करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ठाण्यात किंवा कळव्यात अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येऊ नये, असे पत्रच मनसेने कळवा पोलिसांना दिले आहे. त्याचा मृतदेह हा त्याच्या गावी दफन करण्याची सूचना मनसेने केली आहे.

अक्षय शिंदेच्या दफनासाठी बदलापूर परिसरात जमीन उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी अक्षयचे नातेवाईक आणि अक्षयचे वकील कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात आले होते. न्यायालयीन आदेशाप्रमाणे बदलापूर पोलिसांनी अक्षयच्या नातेवाईकांना बदलापूर परिसरात दोन ते तीन जागा दाखविण्याची तयारी केली आहे. दफनासाठी योग्य जागा मिळाली तर त्या जागेवर अक्षयचे दफन केले जाईल, असे अॅड. कटारनवरे यांनी सांगितले. मात्र, ४ दिवस उलटून गेले तरी देखील अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकलेले नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article