“धनंजय मुंडेंच्या कृपेने आणि वाल्मिक कराडच्या कृपेने त्यांची बदली पुन्हा बीडमध्ये झाली. आम्हाला काल त्यांच्या एका मोठ्या हॉटेलबद्दल कळलं आणि ते लक्झरी हॉटेल आहे अंबेजोगाईला, ते बघून थोडासा धक्का बसला” असं समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या. त्या संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट देणाऱ्या डॉ. अशोक थोरात यांच्याबद्दल बोलत होत्या. वाल्मिक कराडवर सुद्धा याच अशोक थोरात यांनी उपचार केल्याच बोलल जातय. आता अंजली दमानिया यांनी डॉ. अशोक थोरात यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. “ही व्यक्ती जर संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टची सगळी डिटेल्स देणार असेल, तर यांनी योग्य कारवाई केली की नाही अशी शंका मनात येते. कारण हे जेवढे भ्रष्ट लोक आहेत ना, ते काय वाटेल ते करतात पैशासाठी” असं अंजली दमानिया म्हणाल्या.
“चौकशी करूया अनेक गोष्टी पुढे येतील. त्यांची दोन जोडपत्र आहेत प्रत्येक. याच्या पहिला जोडपत्रात बारा आरोप आहेत, अगदी मोठे की कोविड काळात त्यांनी आठ कोटी, दोन कोटी, एक कोटी असे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत. जोडपत्र एकमध्ये पण आहेत. जोडपत्र दोनमध्ये आरोप होते. असे 24 आरोप त्यांच्यावर होते ते अजून प्रलंबित आहेत” असं अंजली दमानिया म्हणाल्या.
काहीही गरज नव्हती हॉस्पिटलमध्ये आणायची
“अशोक थोरात यांनी दोनदा वीआरएसची मागणी केली. ती शासनाने रिजेक्ट केली, कारण अशा व्यक्तीविरुद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा आरोप होते, पेंडिंग आरोप आहेत, त्यांना वीआरएस सुद्धा घेऊ दिला गेला नाही” असं अंजली दमानिया म्हणाल्या. “असा व्यक्ती बीडमध्ये असेल, तर वाल्मिक कराडला आरामात ठेवणारच ना, वाल्मिक कराडला पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं होतं, पण त्याची बेसिक तपासणी करून पाठवलं. दुसऱ्यांदा आणलं, काहीही गरज नव्हती हॉस्पिटलमध्ये आणायची पण तरी तिथे ठेवलं गेलं, मग पुन्हा आम्ही ओरड केल्यानंतर तिथून हलवलं” असं दमानिया म्हणाल्या.
त्यांना कम्फर्टेबल करणारे धनंजय मुंडे आहेत
“पोलिसांवर देखील कारवाई झाली पाहिजे. जे तिन्ही ऑफिसर आहेत, प्रशांत महाजन, राजेश पाटील आणि बारगळ या तिघांवर गुन्हेगार म्हणून जोपर्यंत कारवाई होत नाही. अशोक थोरात सारख्या डॉक्टर्सवर होत नाही तोपर्यंत प्रत्येक असा गुन्हेगार आपापल्या ठिकाणी कम्फर्टेबल असतो आणि त्यांना कम्फर्टेबल करणारे धनंजय मुंडे आहेत म्हणून परत आपण त्यांच्या राजीनामाची मागणी करतोय” असं अंजली दमानिया म्हणाल्या.
त्यांच्याकडे इतकी अफाट संपत्ती आली कुठून?
“अनेक गोष्टी जसं मी ते म्हटलं पियुष इन नावाच एक मोठं हॉटेल बांधलं. त्यांचं हॉस्पिटल देखील आहे. माझा एका सिविल सर्जन विरुद्ध जो अशा गोष्टी करतोय, जो भ्रष्टाचार करतोय, त्याच्या विरुद्धचा माझा लढा आहे” असं अंजली दमानिया म्हणाल्या. “भ्रष्टाचार फक्त दोन वेळा जोडपत्र देऊन होत नाही, त्याचे डिटेल इन्वेस्टीगेशन झालं पाहिजे आणि जे जे पैसे त्यांनी खाल्लेत ते रिकव्हर झाले पाहिजे. त्यांच्याकडे इतकी अफाट संपत्ती आली कुठून? आणि ते एक शासकीय कर्मचारी आहेत. चौकशी झाली पाहिजे” अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.