Apparao Vavre: निवडीनंतर आप्पाराव वावरे यांचे परभणीत स्वागत

2 hours ago 1

युवासेना जिल्हाप्रमुख पदी निवड, परभणीत मोटारसायकल रॅली

परभणी (Apparao Vavre) : येथील भुमिपुत्र आप्पाराव वावरे (Apparao Vavre) यांची शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्यांचे परभणीत जल्लोषात स्वागत करत मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

परभणी शहरातील विसावा फाटा येथे जेसीबीच्या सहाय्याने हार घालून त्यांचा सन्मान करत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. आप्पाराव वावरे यांनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांच्या कामाची पावती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवासेना जिल्हाप्रमुख पदी आप्पाराव वावरे (Apparao Vavre) यांची निवड केली. मोटारसायकल रॅली दरम्यान आप्पाराव वावरे यांनी सर्व महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.

विसावा फाटा येथून जिंतूर रोड, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, वसमतरोड मार्गे खानापुर फाट्यापर्यंत रॅली गेली. रॅलीला राज्य कार्यकारीणी सदस्य युवासेना अ‍ॅड. अमित गिते, अ‍ॅड. जगदीश चापके, संदीपराव कदम, हनुमान बागल, प्रताप लोखंडे, रामभाऊ शिंदे, बाळासाहेब आणेराव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article