Assembly Election: आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्व तयारी; पाथरीत आढावा बैठक

2 hours ago 1

निवडणुक अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पाथरी (Assembly Election) : परभणी/पाथरी आगामी काही दिवसात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) पाथरी विधानसभा मतदारसंघातील तयारी संदर्भात प्रशासकीय अधिकारी कर्मचारी पोलीस पाटील यांची आढावा बैठक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी शहरातील पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना

पंचायत समिती सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये सकाळच्या सत्रात पाथरी,मानवत,सोनपेठ व परभणी ग्रामीण तालुक्‍यातील सर्व तहसिलदार, पोलीस निरिक्षक, नायब तहसिलदार निवडणूक, मंडळ अधिकारी, तलाठी व पोलीस पाटील यांचा आढावा घेण्‍यात आला. आढाव्‍यात नियुक्‍त करण्‍यात आलेले भरारी पथक, स्‍थाई नियंत्रण पथक, इतर नियुक्‍त पथकांतील अधिकारी गावात आल्‍यानंतर त्‍यांना मतदान केंद्र दाखविणे व गावातील कायदा व सुव्‍यवस्‍था च्‍या अनुषंगाने माहिती देत (Assembly Election) निवडणूक काळात सर्व कर्मचारी यांना नियुक्‍तीच्‍या ठिकाणी वास्‍तव्‍यास राहण्‍यासाठी सक्‍त सुचना देण्यात आल्या आहेत.

दुपारी झालेल्या सत्रात मध्‍ये पाथरी, मानवत, सोनपेठ व परभणी ग्रामीण मधील उपस्थित सर्व गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक (Assembly Election) विधानसभा निवडणूकीच्‍या अनुषंगाने मतदान पथके यांना मार्ग मार्गदर्शक ( रुट गाईड ) कामकाज पहाणे बाबत सुचना देण्यात आल्या. यावेळी आचारसंहिता लागु झाल्‍यानंतर 72 तासात करावयाच्‍या कार्यवाहीबाबत  मार्गदर्शन ,  सिव्हीजील  मध्‍ये प्राप्‍त होणारे ऑनलाईन तक्रारीच्‍या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्‍यासाठी सुचना देण्यात आली.

गट विकास अधिकारी यांचेकडे ग्रामीण भागातील आचार संहितेची जवाबदारी असुन कोठेही कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यास सुचित करण्यात आले.  गावातील शाळांमध्‍ये  दुरुस्‍ती करणे आवश्‍यक असल्‍यास त्‍या तातडीने करणे बाबत ही सुचना देण्यात आल्या आहेत. सुचना देवून (Assembly Election) निवडणूक काळात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशी सक्त सुचना  बैठकीत देण्यात आली. बैठकीस  मानवतचे तहसिलदार पांडुरंग माचेवाड , पाथरीचे तहसिलदार एस. एन. हांदेशवार, सोनपेठ  तहसिलदार सुनिल कावरखे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्‍थीत होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article