कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालय भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. नोकरदारांना जादा पेन्शन मिळण्यासाठी आणि त्यांची गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकार सवलतींचा पाऊस पाडणार आहे. पीएफ खात्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी व्याजदर जादा ठेवण्याचे धोरण पण अवलंबले जाऊ शकते. इतकेच नाही तर कंपन्यांचा ईपीएफओमधील वाटा वाढवण्यासाठी पण उपाय करण्यात येऊ शकतात. या सर्व प्रयत्नांमुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी मोठी रक्कम हाती येण्याची शक्यता आहे. त्यांना बक्कळ पैसा मिळणार आहे. पीएफची रक्कम मिळण्यासाठी आता अर्ज फाट्यांना पण बाजूला हटवण्याचा विचार आहे. ग्राहकांना थेट एटीएममधून त्यांची पीएफची रक्कम काढता यावी, अशी तजवीज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. EPFO 3.0 मध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात.
PAN 2.0 नंतर EPFO 3.0 ची भेट
CNBC आवाजच्या वृत्तानुसार, केंद्र सरकार PAN 2.0 नंतर EPFO 3.0 योजनेची घोषणा करू शकते. त्यातंर्गत कर्मचाऱ्यांचे पेन्शन योगदान वाढविण्याचा विचार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांना एटीएममधून पीएफचा पैसा काढण्याची सुविधा देण्यात येणार आहे. सध्या तांत्रिक कारणासाठी वा इतर कारणांमुळे पेन्शन दावा फेटाळण्याचा प्रकार वाढल्याची तक्रार होत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी हे मोठं पाऊल मानण्यात येत आहे. अर्थात हे तुमचे बँकेचे कार्ड नसेल तर पीएफ खात्याकडून कर्मचाऱ्यांना हे एटीएम कार्ड देण्यात येईल. ते कुठल्याही एटीएम कार्डमध्ये वापरून त्यातून रक्कम काढता येईल. त्याचा वापर, त्याची मर्यादा याविषयीची कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हे सुद्धा वाचा
12 टक्क्यांची मर्यादा हटवणार
काही वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, सरकार पीएफ खात्यातील योगदानासाठी सध्या असलेली 12 टक्क्यांची मर्यादा हटवण्याचा विचार करत आहे. कर्मचाऱ्याला त्याच्या बचतीच्या सवयीनुसार पीएफ खात्यात बचतीचा पर्याय देण्यात येईल. त्यामुळे कर्मचारी त्याच्या मनाने कितीही टक्के योगदान जमा करण्यास पात्र असेल. पण त्याच्या पगारानुसार हे योगदान त्याला जमा करता येणार आहे. पगार इतके योगदान त्याला जमा करता येणार नाही.