Atul Save Vs Imtiaz Jalil : औरंगाबाद पूर्वमधील सुरुवातीचे कल भाजपाला धडकी भरवणारे तर नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे. सुरुवातीला सावे यांनी चांगली घौडदौड केल्यानंतर ईव्हीएम मतदानात इम्तियाज जलील यांनी दुसऱ्या फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. त्यांना 16,619 मते आहेत. तर त्याखालोखाल सावे यांना मतं मिळाली आहेत.
औरंगाबाद पूर्वमध्ये मराठा कार्ड तर चालले नाही ना? अशी चर्चा आता दुसऱ्या फेरीपासून रंगली आहे. या ठिकाणचे कल भाजपाला धडकी भरवणारे आहेत. सुरूवातीला आघाडी घेतलेल्या अतुल सावे यांना ईव्हीएम मतातून दे धक्का देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. अर्थात अजून चित्र स्पष्ट व्हायचे बाकी आहेत. पण सध्या इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतल्याचे दिसते. मुस्लिम, दलित आणि मराठा मतांची मोट बांधण्यात जलील यांना यश आल्याचे सध्या तरी दिसते. ताज्या आकडेवारीनुसार, 16,619 मतांसह जलील आघाडीवर आहेत. तर त्याखालोखाल सावे यांना मतं मिळाली आहेत.
लवकरच सविस्तर बातमी…
हे सुद्धा वाचा