Banjara Samaj: स्वयंसेवक बनून लाखो सेवा भक्तांच्या सेवेसाठी पोहरादेवीत हजर राहावे

2 hours ago 1

संस्थापक अध्यक्ष किसनराव राठोड यांचे पदाधिकाऱ्याना आदेश

मानोरा (Banjara Samaj) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिर्थक्षेत्र पोहरादेवीत ५ ऑक्टोंबर रोजी बंजारा विरासत (Banjara Samaj) या जागतिक नंगारा वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी दाखल होत आहेत. या सोहळ्यासाठी देशभरातील लाखो सेवा भक्त उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात कार्यक्रमाचे आयोजक पालकमंत्री संजय राठोड यांचे दूत स्वयंसेवक म्हणून लाखो सेवा भक्तांची सेवा करण्याचे कार्य देशभरातील राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकाऱ्यांनी करण्याचे आदेश संस्थापक अध्यक्ष भगवंत सेवक, धर्मनेता किसनराव राठोड यांनी दिल्याची माहिती धर्मगुरु जितेंद्र महाराज व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा विलास राठोड यांनी धर्मपीठ भक्तीधाम येथे दिली.

व्हेगो नंगारा, चालो पोहरा, एक दन सेवालाल बापू सारु

बंजारा विरासत, (Banjara Samaj) नंगारा म्युझियमच्या लोकार्पण सोहळ्या करिता देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, महामहीम राज्यपाल रमेश बैस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहे. नंगारा म्युझियम यशस्वी लोकार्पण सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणारे राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा यवतमाळ – वाशीम जिल्हयाचे पालकमंत्री ना संजय राठोड, गोरधर्म पिठाधीश्वर व सर्व धर्मगुरु यांचे देशातील समाज बांधवांतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

बंजारा समाजाच्या (Banjara Samaj) इतिहासात प्रथमच बंजारा काशी पोहरागड येथे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. त्याकरिता संपूर्ण देशभरातून लाखोच्या संख्येने बंजारा समाज बांधव पोहरादेवी येथे उपस्थित राहून सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत, त्याकरिता संपूर्ण राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या सर्व राज्यातील पदाधिकाऱ्यांनी ५ ऑक्टोबरला पोहरागड येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या सेवा, सोयी- सुविधा पुरविण्यासाठी स्वयंसेवक म्हणून पंतप्रधान येण्याच्या आदल्या दिवसांपासून राष्ट्रीय बंजारा परिषदेचे तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहायचे आहे, असे कळविले आहे.

दिवंगत धर्मगुरु संत डॉ रामराव बापू महाराजांनी पंतप्रधान मोदी यांची दिल्ली दरबारी भेट घेऊन (Banjara Samaj) बंजारा समाज बांधवांच्या समस्या एकूण घेण्यासाठी पोहरादेवी येथे येण्याचे आमंत्रण पाच वर्षापूर्वी दिले होते. त्यांनी निमंत्रण स्विकारून येण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तो योग आला नाही. तेंव्हा रामनवमीच्या पर्वावर संत डॉ रामराव बापूंनी त्यांचे शिष्य पालकमंत्री ना संजय राठोड यांच्या डोक्यात पगडी घालून समाजाचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची शपथ दिली. तेंव्हापासून पालकमंत्री ना राठोड समाजाची समस्या राज्य सरकारकडे मांडून सोडवत आहेत.

पोहरादेवी, उमरी खुर्द तिर्थक्षेत्र विकासासाठी आजपर्यंत सव्वा सातशे कोटी रुपयांचा सरकारकडून निधी मंजूर करून आणून विकास साधला आहे. पोहरादेवी बंजारा विरासत नंगारा जागतिक वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्याकरीता देशभरातून येणाऱ्या देवी – सेवा – बापू भक्तासाठी भगवंत सेवक किसनराव राठोड यांनी निर्माण केलेले धर्मपीठ भक्तीधाम आणि सामकी याडी शक्तीपीठ हे निवारा, भोजन, सोयी सुविधा साठी सज्ज असल्याची माहितीही धर्मगुरु जितेंद्र महाराजांनी दिली.

लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी बंजारा काशी तिर्थक्षेत्र (Banjara Samaj) पोहरादेवीत शनिवारला दाखल होत असल्याने महान तपस्वी बाल ब्रम्हचारी राष्ट्रसंत डॉ रामराव बापू महाराज यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. जगतगुरु संत सेवालाल महाराज हे माझे दैवत असुन धर्मगुरु संत डॉ रामराव बापू माझे गुरू आहेत. केंद्र सरकारकडे माझ्या गुरूंची भारत देशातील बंजारा समाजाला एका सुचित एस टी किंवा एस सी प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी त्यांची मागणी होती. ती माझ्या गुरूची मागणी देशभरातील लाखो सभेला उपस्थित सेवा भक्तांच्या साक्षीने मान्य करण्याची विनंती पंतप्रधान मोदी यांच्याकडे पोहरादेवीत करणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article