Baramati News: बारामती विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवव्या फेरी नंतर 44 हजाराचे लीड मिळविल्या नंतर बारामती शहरातील भिगवण चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात एकच जल्लोष सुरु केला.
कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकमेकांना पेढे भरवत विजेयाचा आनंदोत्सव सुरु केला. गेल्या दोन दिवसांपासून बारामती शहर आणि तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर मोठ्या प्रमाणात लागले होते.
सकाळच्या सत्रात अजित पवार यांचे मताधिक्य वाढल्यानंतर शेर आणि परिसरात ठीक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला. विविध घोषणांनी बारामती शहर आणि परिसर दणाणून गेला होता.