Bike Tank Full: तुम्ही तुमच्या Bike Tank मध्ये पेट्रोल किती भरता? म्हणजे फुल्ल भरता की 100 किंवा 200 रुपयांचं म्हणजेच अगदी कामापुरतं भरता? असं तुम्ही करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट माहित असायला पाहिजे की, यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.
Bike Tank फुल्ल ठेवण्याचे काही फायदे होऊ शकतात. यामुळे तुमच्या Bike ची परफॉर्मन्स तर सुधारू शकतेच शिवाय तुमचे पैसेही वाचतील. तुम्ही आतापर्यंत 100 किंवा 200 रुपयांचे पेट्रोल भरून Bike चालवत असाल तर असे करणे टाळा. आज आम्ही तुम्हाला Bike Tank मध्ये पेट्रोल भरून ठेवण्याचे फायदे सांगणार आहोत. जाणून घेऊया.
1. मजबूत मायलेज
Bike Tank भरली की इंजिनातील इंधनाचा दाब स्थिर राहतो. इंजिन पूर्ण क्षमतेने चांगले काम करते आणि मायलेज अधिक चांगले होऊ शकते. अर्धी किंवा त्यापेक्षा कमी Bike Tank असेल तर इंधन पंपाला जास्त मेहनत घ्यावी लागते, ज्याचा परिणाम मायलेजवर होतो.
2. इंधन पंपाची सुरक्षा
Bike Tank फुल्ल असल्याने इंधन पंप थंड राहतो. कमी इंधनामुळे पंप जास्त गरम होऊ शकतो आणि त्याचे लाईफ कमी होऊ शकते.
3. पाण्याचे थेंब तयार होण्याचा धोका
रिकाम्या Bike Tank मध्ये हवेच्या संपर्कामुळे पाण्याचे थेंब तयार होण्याचा धोका असतो. हे पाणी इंधनात मिसळून इंजिनची कार्यक्षमता बिघडवू शकते.
4. लांब पल्ल्याच्या प्रवासात आराम
Bike Tank भरली की पुन्हा पुन्हा थांबण्याची गरज नसते. वेळेची बचत होते आणि प्रवास अधिक सोयीस्कर होतो.
5. किंमतीत बचत
इंधनाचे दर वाढण्यापूर्वी आपण Bike Tank भरू शकता. यामुळे भविष्यात वाढलेल्या किमतींचा परिणाम तुम्हाला कमी जाणवेल.
काय लक्षात ठेवावे?
Bike Tank नेहमी पूर्णपणे भरू नका, कारण उष्णतेमुळे इंधन गळती होऊ शकते.
Bike Tank 90-95 टक्क्यांपर्यंत भरण्याचा सल्ला दिला जातो.
नियमित सर्व्हिसिंगसह Bike चा परफॉर्मन्स आणि मायलेज कायम ठेवा.
Bike Tank फुल्ल असेल तर मार्ग तुमची Bike बराच काळ फिट आणि फाईन ठेवू शकतो.