केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या बजेटमधून महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. निर्मला सीतारामन यांनी आपला आठवा बजेट मांडताना शेतकरी, महिला आणि शिक्षणावर अधिक भर दिलेला आहे. या बजेटमध्ये डे केअर सेंटरपासून 3 AI पर्यंतच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच विमा क्षेत्रात 100 टक्के विदेशी गुंतवणूक करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. याशिवाय पुढच्या आठवड्यात संसदेत नवीन आयकर विधेयक आणण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच देशातील जनतेला धार्मिक स्थळांवर जाता यावं म्हणून धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन दिलं जाणार असल्याची मोठी घोषणाही त्यांनी केली आहे.
बजेटमध्ये काय काय?
स्टार्टअपसाठी कर्जाची मर्यादा 10 कोटीवरून 20 कोटी करण्यात आली आहे. गॅरंटी फि सुद्धा कमी होमार आहे.
MSME साठी लोन गॅरंटी कव्हर 5 कोटीवरून 10 कोटी करण्यात आली आहे. त्यामुळे 1.5 लाख कोटी पर्यंतचं कर्ज मिळणार आहे.
डोंगराळ भागात छोटे विमानतळ बनवण्यात येणार आहेत
एक लाख अर्धवट घरे बांधली जाणार आहेत
20 हजार कोटी रुपयांचे अणू ऊर्जा मिशन
नव्या उड्डाण योजनेशी 200 नवीन शहरे जोडली जाणार आहेत
पटना एअरपोर्टची क्षमता वाढवली जाणार आहे, नवीन ग्रीनफिल्ड एअरपोर्ट उघडण्यात येणार आहे
जल जीवन मिशन 2028पर्यंत वाढवलं जाणार आहे
मेडिकल महाविद्यालयात 75000 सीट वाढवणार
अर्बन चॅलेंज फंडासाठी एक लाख कोटीची तरतूद, शहरातील गरीबांचे उत्पन्न वाढवण्यावर भर
3 AI एक्सिलन्स सेंटर उघडणार
देशात नवीन 200 डे केयर कॅन्सर सेंटर उघडणार
IIT पटनाला अर्थ सहाय्य देणार
भारतीय खेळण्यांची एक्सपोर्ट सिस्टिम, स्टार्टअपसाठी 20 रुपयांचं कर्ज
किसान क्रेडिट लिमिट पाच लाखावर, स्वस्त व्याजावर शेतकऱ्यांना पाच लाखांचे कर्ज देणार, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच वर्षाचा पॅकेज देणार
आसाममध्ये यूरिया प्लांटची स्थापना करणार
कृषी योजनांद्वारे 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार
कॉटन प्रोडक्टिव्हिटीसाठी पाच वर्षाचे मिशन
मखाना बोर्डाची स्थापना करणार
पीएम धनधान्य कृषी योजना सुरू करणार, 10 जिल्ह्यात ही योजना चालवणरा, कमी उत्पादन असणाऱ्या भागात ही योजना लागू होईल
खाद्य तेलात आत्म निर्भर होण्यासाठी सहा वर्षाचं मिशन हाती घेणार
फळ, भाजीपाल्यासाठी व्यापक प्रोग्राम राबवणार
मोदींमुळेच अर्थव्यवस्थेला गती
दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना देशाच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा कारभार सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वामुळेच देशाची आर्थिक व्यवस्था अधिक गतिमान झाली आहे. ही अर्थव्यवस्था अजूनही गतिमान होईल, असं सीतारामन म्हणाल्या.