वाहन आणि दुचाकीच्या मालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुमच्याकडे वॅलिड थर्ड-पार्टी इश्यूरन्स असलाच पाहिजे. अन्यथा तुम्हाला पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही. फक्त पेट्रोल-डिझेलच नाही, तर FASTag साठी सुद्धा तुम्हाला इंश्यूरन्स पेपर दाखवावे लागतील. म्हणजे तुम्हाला तुमच्या वाहनाची वॅलिड थर्ड-पार्टी इश्यूरन्स पॉलिसी FASTag शी लिंक करावी लागेल. तुमच्याकडे थर्ड-पार्टी इश्यूरन्स प्रूफ असेल, तरच तुम्हाला इंधन विकत घेता येईल. अन्य लाभांचा सुद्धा फायदा मिळेल. जर, तुम्ही इश्यूरन्स पॉलिसीशिवाय रस्त्यावर वाहन चालवताना पकडला गेलात, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल.
सरकारने फ्यूल खरेदी, FASTag आणि पॉल्यूशन- लायसेन्स सर्टिफिकेट घेण्यासाठी इंश्यूरन्स प्रूफ दाखवणं कंपलसरी केलं आहे.
थर्ड पार्टी इंश्यूरन्स आवश्यक
भारतात सर्व वाहनांसाठी थर्ड पार्टी इंश्यूरन्स बंधनकारक झाला आहे. यात टू व्हीलर आणि 4 व्हीलर व्हीकल्स आहेत. तुमच्याकडे कार, बाइक-स्कूटर असल्यास इंश्यूरन्स आवश्यक आहे.
यापुढे भारतातल्या रस्त्यांवर थर्ड पार्टी इंश्यूरन्सशिवाय वाहन चालवणं बेकायद आहे. त्यासाठी तुमच्यावर दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो.
थर्ड पार्टी इंश्यूरन्समध्ये तुमच्या व्हीकलमुळे थर्ड पार्टीच होणारं नुकसान वाचवता येतं. तुम्ही कुठल्या अपघातात सहभागी असाल, तर थर्ड पार्टी इंश्यूरन्स थर्ड पार्टीच झालेलं नुकसान कव्हर करु शकतो.
मोटर व्हीकल कायदा काय सांगतो?
मोटर व्हीकल कायद्यानुसार रस्त्यावर धावणाऱ्या सर्व वाहनांच थर्ड-पार्टी इंश्यूरन्स कव्हर असलं पाहिजे. सरकारने नवीन इश्यूरन्स विकत घेताना FASTag ला वॅलिड थर्ड-पार्टी इश्यूरन्स पॉलिसीशी जोडणं कंपलसरी केलं आहे.
FASTag जोडणं का आवश्यक?
याचा अर्थ असा आहे की, पेट्रोल पंपावर व्हीकलमध्ये इंधन भरताना इंश्यूरन्स काढलाय की, नाही ते चेक होईल. बऱ्याचदा FASTag सिस्टिमच्या माध्यमातून सर्व काही तपासलं जातं. आता फास्टटॅगमध्येही इंश्यूरन्सला जोडावं लागणार आहे.