एखाद्याची मदत करणं हे एक चांगलं काम मानलं जातं. नेहमी दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या व्यक्तीला जगात मोठा मान-सन्मान मिळतो. मात्र अनेकदा तुम्हाला एखाद्याची मदत करण्याची इच्छा असते, मात्र तुम्ही मदत करून देखील त्याची समस्या सुटत नाही, तर काही वेळेला तुम्ही एखाद्याची मदत करतात मात्र तो व्यक्ती तुमचे आभार मानण्याऐवजी तुम्हालाच दोष देतो. आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रथांमध्ये असे तीन लोक सांगितले आहेत, की ज्यांना कधीही मदत केली नाही पाहीजे, अन्यथा तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते.
आर्य चाणक्य म्हणतात असे लोक दूरच ठेवले पाहिजे, त्यांची मदत केली नाही पाहिजे. जे लोक दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करत नाहीत, दुसऱ्यांसोबत अपमानास्पद व्यवहार करतात. ज्यांच्या संगतीमध्ये राहून त्यांच्या वाईट गुणांमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. अशा लोकांपासून कायम सावध राहावे असं आर्य चाणक्य सांगतात.या लोकांच्या सहवासापासून दूर राहिलात तरच तुम्ही तुमची प्रगती करू शकाल असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.पाहूयात आर्य चाणक्य काय म्हणतात.
असंस्कारी महिलांपासून दूर राहा
चाणक्य म्हणतात ज्या स्त्रीचं चारित्र चांगलं नाही, तिच्यासोबत जर तुम्ही लग्न केलं तर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येते, तुमचा संसार नष्ट होऊ शकतो. त्यामुळे कधीही अशा स्त्रीसोबत लग्न करू नका, ज्या महिलेचा स्वाभाव हा भांडखोर असतो तिच्यापासून देखील योग्य ते अतंर ठेवा असं चाणक्य म्हणतात.
मूर्ख शिष्य
आर्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार अज्ञानी शिष्याला तुम्ही कितीही शिकवा त्याचं पालथ्या घड्यावर पाणी असतं. त्याला काहीच समजत नाही. एका अज्ञानी शिष्यामागे तुम्ही तुमची ऊर्जा आणि मेहनत वाया घालवण्यात काहीही उपयोग नाही. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, अशा लोकांपासून दूर रहा असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.
आजारी व्यक्ती
आजारी वक्ती हे नेहमी नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करत असतात. सोबतच ते कायम दु:खी असतात. ते तुमच्या प्रगतीमधील अडथळा बनू शकतात. त्यामुळे आर्य चाणक्य अशा लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)