Child labor: सिटीलँड, बिझीलँड मध्ये बालकामगारांचे शोषण

2 hours ago 1

भीम ब्रिगेडने केली बालकामगारांची सुटका

नांदगाव पेठ (Child labor) : एशियामधील सर्वात मोठे कापड मार्केट असलेले सिटीलँड आणि बिझीलँड मध्ये अनेक बालकामगारांचा भरणा असून त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेत अत्यल्प वेतनावर अनेक दुकानांमध्ये बालकामगारांना कामावर ठेवल्याने शनिवारी सायंकाळी कामगार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भीम ब्रिगेडने दहा ते बारा बालकामगारांची (Child labor) मुक्तता केली. या प्रकारामुळे बाल न्याय हक्क संदर्भातील शासनाच्या नियमावलीला दुकानमालकांनी तिलांजली दिल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाहीची मागणी भीम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोड यांनी यावेळी केली.

कामगार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यवाही

बिझिलँड आणि सिटीलँड मधील अनेक दुकानांमध्ये कायद्याचे उल्लंघन करत मालकांनी अत्यल्प वेतनावर (Child labor) बालकामगार कामावर ठेवल्याची माहिती भीम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोड यांना मिळाली होती. प्रवीण मोहोड यांनी याबाबत कामगार आयुक्त व जिल्हा कामगार अधिकारी यांना लेखी तक्रार देऊन कार्यवाहीची मागणी केली होती.तरीसुद्धा कामगार आयुक्त व अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल न घेतल्याने शनिवारी प्रवीण मोहोड, संस्थांपक अध्यक्ष राजेश वानखडे व भीम ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी अचानक सिटीलँड मधील समता क्रिएशन, माहेरा क्रिएशन, वानी , मन्नत , रोनक, डि.के कपडा प्रतिष्ठान याठिकाणी धाडी मारून काम करणाऱ्या (Child labor) बालकामगारांना बाहेर काढले व त्यांची मुक्तता केली.

Child labor

कामगार अधिकाऱ्यांनी यावेळी सर्वांचे आधार कार्ड तपासले असता सर्व मुले ही ११ ते १५ वयोगटातील असल्याचे सिद्ध झाले.घरची परिस्थिती हलाकीची असल्याने ही मुले कामाच्या शोधत दुकानात येतात मात्र त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेत अत्यल्प वेतनावर त्यांना कामावर ठेवण्यात येते व त्यांच्याकडून कठीण कामे करण्यात येते असा प्रकार याठिकाणी सुरू असल्याने भीम ब्रिगेडच्या वतीने ही कार्यवाही करण्यात आल्याची प्रतिक्रिया प्रवीण मोहोड यांनी यावेळी दिली.

ठोस कार्यवाही नाही

या प्रकरणी दंडात्मक तथा कठोर शिक्षेची तरतूद असतांना (Child labor) कामगार अधिकाऱ्यांच्या वतीने केवळ थातुरमातुर कार्यवाही करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पोलीस ठाण्यात सुद्धा याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार देण्यात आली नाही हे विशेष! त्यामुळे वरिष्ठ अधिकारी याप्रकरणी काय कार्यवाही करतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article