संकष्ट चतुर्थीला भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी महिलांनी घेतले परिश्रम
हिंगोली (Chintamani Ganapati Mandir) : श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरात मागील दीड वर्षापासून राहोली बु.येथील चार महिलांनी प्रत्येक संकष्ट चतुर्थीला विनामूल्य सेवा दिल्याने त्यांचा श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदीर संस्थानतर्पेâ सत्कार करण्यात आला.
प्रत्येक चतुर्थीला हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. अशावेळी भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी राहोली बु.येथील निर्मला अशोक नानवटे, कमल श्रीराम डोरले, पार्वती सखाराम डोरले आणि आशाबाई शिवाजीराव नानवटे या चार महिलांनी भाविकांचे स्वागत करून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे प्रत्येक भाविकांना गणपती बाप्पाचे दर्शन मिळावे यासाठी त्यांच्याकडून परिश्रम घेतले जात होते. (Chintamani Ganapati Mandir) श्री च्या पालखी उत्साहातही दहा दिवसात कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता भाविकांसाठी सदैव या चार तत्पर महिलांनी सेवा केली. त्यामुळे मंदीर संस्थानच्यावतीने या चारही महिलांना साडी, चोळी देऊन सन्मान करण्यात आला. महिलांनी दिलेल्या विनामूल्य सेवेबद्दल इतरांनीही त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदीर संस्थान तर्फे करण्यात आले आहे.