वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन या भागातील प्रवाशांसाठी तीन अंर्तमार्गिका खुल्या करण्यात आल्यात. तर मरिन लाईन्स ते वांद्रे सी-लिंक हा प्रवास अवघ्या १० मिनिटात करण्यात येणार आहे.
मुंबईकरांसाठी एक आनंदाची आणि मोठी बातमी आहे. आजपासून मुंबईतील कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन या भागातील प्रवाशांसाठी तीन अंर्तमार्गिका खुल्या करण्यात आल्यात. तर मरिन लाईन्स ते वांद्रे सी-लिंक हा प्रवास अवघ्या १० मिनिटात करण्यात येणार आहे. धर्मवीस स्वराज्यरक्षक संभाजी महाराज अर्थात कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. आज सकाळी सात वाजेपासून सर्वसामान्य नागरिक, मुंबईकरांसाठी हा कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कोस्टल रोडसाठी एकूण १४ हजार कोटींचा खर्च लागला असून या हा रोड एकूण १०.५८ किमी लांबीचा आहे. दरम्यान, या कोस्टल रोडवरून वांद्रे ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत होणार आहे. सकाळी सात वाजेपासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहनांसाठी हा रस्ता खुला असणार आहे. या मार्गावर अनेक उन्नत रस्ते, बोगदे, पूलांचा समावेश आहे. या कोस्टल रोडवर एकूण ८ मार्गिका तर इतर ठिकाणी बोगद्यात ६ मार्गिका असणार आहे. या बोगद्यांमध्ये ६० किमी\ताशी वेगमर्यादा देण्यात आली आहे.
Published on: Jan 27, 2025 12:06 PM