Published on
:
29 Nov 2024, 10:03 am
Updated on
:
29 Nov 2024, 10:03 am
तुमच्या नावाने स्विगी, झोमॅटोवर जेवणाची ऑर्डर चुकून प्लेस झाली आहे. ही ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर करा, असे सांगून स्कॅमर्स ग्राहकांच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर काढून घेत आहेत. पिंपरी-चिंचवड शहर परिसरात मागील दहा महिन्यात सुमारे दीडशे जणांची अशाप्रकारे फसवणूक करण्यात आल्याची नोंद पोलिसांच्या दप्तरी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
नागरिकांना फसवण्यासाठी स्कॅमर्स दररोज नवनवीन फंडे वापरत आहेत. तुमचे बँक खाते फ्रीज करण्यात आले आहे, एटीएम कार्ड लवकरच बंद पडणार आहे, अशी वेगवेगळी कारणे सांगून नागरिकांना भीती घातली जाते. यातून सुटका करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक विचारून बँक खाती रिकामी करण्याचा सपाटा स्कॅमर्सकडून सुरू आहे.
महाराष्ट्र सायबर विभाग यावर काम करत असताना, स्कॅमर्सने आता स्विगी, झोमॅटो या कंपन्यांचे नाव वापरूनदेखील फसवणूक करण्याचे षङ्यंत्र सुरू केले आहे. त्यामुळे अन्न मागवणार्या ऑनलाइन ग्राहकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
या मोडस ऑपरेंडीमध्ये स्कॅमर्स ऑनलाइन खरेदी करणार्या ग्राहकांना टार्गेट करतात. तुमच्या नावे स्विगी आणि झोमॅटो येथे जेवणाची ऑर्डर प्लेस झाल्याचे सुरुवातीला सांगितले जाते. आपण ऑर्डर दिली नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर समोरून चुकून तुमच्या नावे ही ऑर्डर प्लेस झाल्याचे सिस्टीमला दिसत असल्याचे सांगितले जाते. तसेच, ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी मोबाईलवर आलेला चार अंकी ओटीपी विचारला जातो. स्विगी, झोमॅटो कंपनीतूनच फोन असल्याचा समज झाल्याने ग्राहकदेखील कसलाही विचार न करता ओटीपी शेअर करतात. ओटीपी शेअर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच बँक खात्यातील रक्कम स्कॅमर्स परस्पर दुसर्या खात्यांवर वळवून घेतात. बँकेचा रक्कम डेबिट झाल्याचा मेसेज आल्यानंतर ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला असतो.
फसवणुकीसाठी लिंकचाही वापर
स्विगी, झोमॅटोच्या नावाखाली फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्स मोबाईलवर लिंकदेखील पाठवतात. चुकून प्लेस झालेली जेवणाची ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी संबंधित लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. ग्राहकाने लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईलचा अॅक्सेस थेट स्कॅमर्स मिळवतात. त्यानंतर मोबाईल मधील गोपनीय माहिती व पिन मिळवून चोरटे बँक खात्यातून पैसे चोरून घेतात.
फसवणूक टाळण्यासाठी हे करा
अनोळखी फोन कॉल्स किंवा मेसेजवर कधीही विश्वास ठेवू नका. कारण बँक तुमचा तपशील कधीच विचारत नाही.
ओटीपी (वन टाइम पासवर्ड) कधीही शेअर करू नका, कारण ओटीपीचा वापर हा ग्राहकांच्या व्यवहाराची पुष्टी करण्यासाठी केला जातो. जर तुम्ही तुमचा ओटीपी शेअर केला तर पोलिस किंवा बँक काहीही करू शकत नाहीत.
ओटीपी प्रमाणेच सीव्हीव्ही नंबर, आईचे पूर्वीचे नाव, जन्मतारीख हे बँकेमध्ये पासवर्ड किंवा गुप्त प्रश्नांची उत्तरे म्हणून वापरले जातात.
ईमेलच्या, मेसेजमधील इंग्रजी शब्दांचा वापर तपासा
(फसवणूक करणार्या बहुतेक इमेल, मेसेजमध्ये चुकीचे इंग्रजी किंवा शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात.)
फसवणूक झाल्यास हे करा
बँकेत विवाद फॉर्म तत्काळ भरा.
पोलिस स्टेशन / सायबर सेलला कळवा.
कॉल / चॅट हिस्ट्री, पेमेंट हिस्ट्री इत्यादी सारखे सर्व पुरावे गोळा करा.
ऍप, शेअर केलेल्या लिंक्स, फसवणूक करणार्याचा तपशील यासारखे कोणतेही पुरावे मिटवू नका. यामुळे पोलिसांना तपास करण्यात आणि कारवाई करण्यास मदत होते.
जवळच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करा किंवा स्थानिक पोलिस स्टेशनची मदत घ्या.
पोलिसांपासून काहीही लपवू नका.
तक्रार करण्यासाठी तुम्ही हेल्पलाइन 1930 (गृह मंत्रालय, भारत सरकारद्वारे) वर कॉल करू शकता.
राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल हीींिीं:// लूलशीलीळाश. र्सेीं. ळप/ वर देखील तक्रार नोंदवू शकता