दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात स्फोट झाल्यानंतर एनएसजी कमांडो घटनास्थळी दाखल झाले.ANI X Photo
Published on
:
28 Nov 2024, 10:15 am
Updated on
:
28 Nov 2024, 10:15 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात आज (दि.२८) सकाळी ११.४८ च्या सुमारास स्फोट झाला. हा स्फोट बन्सी स्वीट्सजवळ झाला, तो कोणत्या प्रकारचा होता, हे अद्याप समजू शकलेले नाही. श्वान पथक, FSL एफएसएल टीम आणि इतर तज्ज्ञ पथकासह एनएसजी (NSG) कमांडो घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहे.
स्थानिकांनी ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. दिल्ली पोलिसांनी माहिती मिळताच पोलिस दल घटनास्थळी पाठवले. त्याचवेळी अग्निशमन विभागालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. प्रशांत विहार येथील बन्सी स्वीट्सजवळ स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. पुढील चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.
#WATCH | NSG commandos with dog unit, FSL team and other expert units carry out further investigation at the site of explosion at Prashant Vihar in Delhi.
NSG has set up a counter of the bomb disposal unit at the spot. pic.twitter.com/LE2fG73P7x
— ANI (@ANI) November 28, 2024