धुळ्यात 10 हजार किलो चांदीच्या विटा जप्त
Published on
:
20 Nov 2024, 8:47 am
Updated on
:
20 Nov 2024, 8:47 am
धुळे : शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने सुमारे 94 कोटी 68 लाख रुपये किमतीच्या दहा हजार किलो वजनाच्या चांदीच्या विटा ताब्यात घेतल्या आहेत. या विटा एचडीएफसी बँकेच्या असल्याची प्राथमिक माहिती असून या संदर्भात तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस पथकाने मध्यप्रदेशातून तसेच गुजरात मधून येणाऱ्या सर्व मार्गांवर तपासणी नाके लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे फिरत्या पथकाच्या माध्यमातून संशयित गाड्यांची तपासणी सुरू आहे. या अंतर्गतच थाळनेर पोलिसांनी एका कंटेनरला थांबवून त्याची तपासणी सुरू केली असता यात चांदीच्या विटा आढळून आले आहेत. सुमारे 94 कोटी 68 लाख रुपये किंमत असलेल्या दहा हजार किलो वजनाच्या या विटा एच डी एफ सी बँकेच्या असल्याची माहिती पुढे आली आहे. या संदर्भात पोलिसांनी संबंधित चांदीच्या साठ्याच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.