इयरबड्स प्रत्येक जण वापरतो. हा रोजच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. म्युझिक ऐकणे असो, कॉल्स अटेंड करणे असो किंवा ऑनलाईन मीटिंगमध्ये सहभागी होणे असो, इअरबड्स सर्वत्र कामी येतात. परंतु त्यांना स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण घाणेरड्या इयरबड्समुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. याविषयी जाणून घ्या.
इयरबड्स स्वच्छ करण्यासाठी ‘या’ टिप्स वापरा
- मायक्रोफायबर कापड
- मऊ ब्रश (जुने टूथब्रश देखील वापरू शकता)
- किंचित ओले कापड किंवा आयसोप्रोपिल अल्कोहोल (70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त)
- इयरबड्सची पॉवर बंद करा
- इयरबड्स स्वच्छ करण्यापूर्वी ते चार्जिंग केसमधून बंद आणि बाहेर आहेत याची खात्री करा.
पृष्ठभाग स्वच्छ करा
- मायक्रोफायबर कापडाने इयरबड्सचा बाह्य पृष्ठभाग पुसून घ्या.
- स्पीकर ग्रिलमध्ये जमा झालेली घाण किंवा लहान छिद्रे ब्रशने हलकी स्वच्छ करा.
आतील भाग स्वच्छ करा
- कापड हलके ओले करा किंवा त्यावर थोड्या प्रमाणात आयसोप्रोपिल अल्कोहोल लावा.
- इयरबड्सच्या पृष्ठभागावर हळूवारपणे चोळा.
- इयरबड्सच्या आत कोणताही द्रव जाणार नाही याची काळजी घ्या.
चार्जिंग केस स्वच्छ करणे
- चार्जिंग केस कोरड्या आणि ओल्या कापडाने स्वच्छ करा.
- पिन आणि कनेक्टरवर जास्त दबाव आणू नका.
खबरदारी कोणती घ्यावी?
- पाण्याचा वापर करू नका, विशेषत: जर इयरबड्स वॉटरप्रूफ नसतील.
- नियमितपणे स्वच्छ करा, विशेषत: जर आपण रोज इयरबड्स वापरत असाल तर.
- साफसफाईनंतर ते पूर्णपणे कोरडे होऊ द्या.
‘हे’ देखील वाचा
सध्या इयरबड्सला मागणी आहे. इयरबड्स हा हेडफोनचा एक छोटा प्रकार आहे. यामध्ये युजर्सला इयरफोन आणि हेडफोन या दोन्हीचा आनंद मिळतो. मात्र इयरबड्सची किंमत इयरफोनपेक्षा थोडी जास्त आहे. हे हेडफोन व्हॉइस असिस्टंट आणि नॉइस कॅन्सलेशन फीचर्ससह येतात.
ओव्हर इयर हेडफोनसंपूर्ण कान झाकून ठेवतात. तसेच, त्यांच्या मोठ्या आकारामुळे, त्यांना मोठे ड्रायव्हर देखील बसवले जाऊ शकतात, ज्यामुळे वेगवान आवाज आणि चांगला बास मिळतो. तसेच संपूर्ण कान झाकल्यामुळे हे हेडफोन बाहेरील आवाज मोठ्या प्रमाणात कमी करतात. पण यामुळे कानावर ही दबाव पडतो.
इयरबड्स म्युझिक ऐकणे असो, कॉल्स अटेंड करणे असो किंवा ऑनलाईन मीटिंगमध्ये सहभागी होणे असो, इअरबड्स सर्वत्र कामी येतात. परंतु त्यांना स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण घाणेरड्या इयरबड्समुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. यासाठी तुम्हाला वरील माहिती उपयोगात येईल.