Pune Politics: मतकर्तव्य केले, तरच इच्छापूर्ती होईल..., नको विनाशकाले विपरीत बुध्दी, करूया 100% मतदान..., मतकर्तव्य करा, मग हक्क सांगा... आदी मतदान करण्याबाबत जनजागृती करणारे एक ना अनेक होर्डिंग शहरात झळकले आहेत. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी झळकविलेले फलक पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.
सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाचा हक्क बजावणार्या पुणेकरांना प्रोत्साहित करण्यासह मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आशा पब्लिसिटीमार्फत हे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. यंदाची निवडणूक ही राज्याची भविष्यातील दिशा ठरवणारी असल्याने अत्यंत महत्त्वाची निवडणूक असल्याचे दिसून येत आहे.
या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगापासून अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणजे हा उपक्रम असल्याची माहिती संचालक चंद्रकांत कुडाळ यांनी दिली आहे.