राज्यातील एकूण 288 मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. राज्यातील मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्व उमेदवारांचं भवितव्य हे मतपेटीत कैद झालं आहे. त्यामुळे आता सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते आणि जनतेला 23 नोव्हेंबरची प्रतिक्षा लागून आहे. राज्यात कुणाचं सरकार येणार? कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी होणार? हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआधी मतदान पार पडल्यानंतर आता विविध संस्थेचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाचं सरकार येईल? कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याबाबत काय अंदाज वर्तवण्यात आला आहे, हे जाणून घेऊयात.
मविआ अर्थात महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे 3 पक्ष आहेत. तर महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा समावेश आहे. आतापर्यंत इलेक्टोरल एज, पोल डायरी, चाणक्य स्ट्रेटेजीस, मॅट्रिझ आणि पी मॉक्यू यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या पोलनुसार कोणत्या पक्षाचे किती उमेदवार जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, हे जाणून घेऊयात.
इलेक्टोरल एजचा एक्झिट पोल
इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलनुसार, मविआला सत्ता स्थापनेची सर्वाधिक संधी आहे. या पोलमध्ये मविआला 150 तर महायुतीला 118 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर मविआमध्ये काँग्रेस आणि महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे.
इलेक्टोरल एज पक्षनिहाय अंदाज
महायुती – 118
भाजप – 78 शिंदे सेना – 26 अजित पवार – 14
मविआ -150
काँग्रेस – 60 ठाकरे गट – 44 शरद पवार गट – 46