महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज दिवसभरात मतदान पार पडलं आहे. त्यानंतर आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या एक्झिट पोलच्या आकडेवारीत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. अनेक संस्थांनी आपल्या आकडेवारीत महायुतीला यश मिळू शकतं, असा अंदाज वर्तवला आहे. पण सर्व एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर भाजपला या निवडणुकीत 100 चा आकडा गाठताना देखील नाकेनऊ येण्याची शक्यता आहे. अनेक संस्थांनी तर भाजपला 80 पेक्षाही कमी जागांवर यश मिळू शकतं, असा अंदाज वर्तवला आहे. टीव्ही 9 रिपोर्ट पोलनुसार, राज्यात भाजपला 81 पेक्षा जास्त जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ भाजपला 100 जागांपेक्षा जास्त यश मिळण्याची शक्यता कमी आहे. विविध संस्थाचे पोलनुसार भाजपसाठी नेमकी काय-काय आकडेवारी जाहीर केली आहे? याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.
इलेक्टोरल एजनुसार भाजपला 78 जागा
इलेक्टोरल एजच्या पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीला 118 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर मविआला तब्बल 150 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार, भाजपला केवळ 78 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाला 26, अजित पवार गटाला 14 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 20 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार, काँग्रेसला महाविकास आघाडीत सर्वाधिक 60 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर ठाकरे गटाला 44 आणि शरद पवार गटाला 46 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
पोल डायरीनुसार भाजपला 77-108 जागा
पोल डायरीच्या अंदाजानुसार, राज्यात महायुतीचं सरकार बनण्याची शक्यता आहे. महायुतीला 122-186 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 69-121 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 12-29 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार, भाजपला 77-108 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. केवळ पोल डायरीनुसार भाजपला कमीत कमी 77 आणि जास्तीत जास्त 108 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच पोलनुसार, शिंदे गटाला 27-50 आणि अजित पवार गटाला 18-28 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा
चाणक्य स्ट्रॅटेजीसनुसार भाजपला 90 जागा
चाणक्य स्ट्रॅटेजीसच्या पोलनुसार, महायुतीला 152-160 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 6-8 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पण या पोलनुसार, भाजपला केवळ 90 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला 48 जागांवर, तर अजित पवार गटाला 22 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसला 63, ठाकरे गटाला 35 आणि शरद पवार गटाला 40 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
मॅट्रिझनुसार भाजपला 89 ते 101 जागा
मॅट्रिझच्या पोलनुसार, महायुतीला 105 ते 170 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पण तरीही भाजपला केवळ 89 ते 101 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला 37 ते 45 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाला 17-26 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला 110-130 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार, काँग्रेसला 39-47, ठाकरे गटाला 21-39, शरद पवार गटाला 35-43 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.