G20 Summit | पीएम मोदी- UK पीएम कीर स्टार्मर यांच्यात टेक्नॉलॉजी, ग्रीन एनर्जीवर चर्चा

4 days ago 2

ब्राझीलमध्ये जी २० (G20) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची भेट घेतली. (Image source- @narendramodi)

पुढारी वृत्तसेवा

Published on

19 Nov 2024, 5:52 am

Updated on

19 Nov 2024, 5:52 am

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्राझीलमध्ये जी २० (G20 Summit) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी रात्री ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर (UK PM Keir Starmer) यांची भेट घेतली. उभय नेत्यांच्या भेटीदरम्यान तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, सुरक्षा आणि कल्पकता यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करण्याबाबत द्विपक्षीय चर्चा झाली.

"ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासोबत रिओ द जानेरिओमध्ये झालेली बैठक अत्यंत सकारात्मक होती. भारतासाठी, ब्रिटन सोबत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. पुढील काही वर्षांत, आम्ही तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, सुरक्षा आणि कल्पकता यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत. आम्हाला व्यापार तसेच सांस्कृतिक संबंध मजबूत करायचे आहेत," असे पीएम मोदी यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Had an extremely productive meeting with Prime Minister Keir Starmer in Rio de Janeiro. For India, the Comprehensive Strategic Partnership with the UK is of immense priority. In the coming years, we are eager to work closely in areas such as technology, green energy, security,… pic.twitter.com/eJk6hBnDJl

— Narendra Modi (@narendramodi) November 18, 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article