नवी दिल्ली/न्यूयॉर्क (Gautam Adani Arrest Warrant) : न्यूयॉर्क न्यायालयाने भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्याविरुद्ध लाचखोरी आणि फसवणूक प्रकरणात अटक वॉरंट जारी केले आहे. अदानी समूहाने भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना $265 दशलक्ष (सुमारे 2,029 कोटी रुपये) लाच देऊन पॉवर कॉन्ट्रॅक्ट मिळवल्याचा आरोप यूएस वकिलांनी केला आहे.
न्यायाधीश रॉबर्ट एम. लेव्ही यांच्या न्यायालयाने 31 ऑक्टोबर 2024 रोजी अटक वॉरंट उघडण्याचे आदेश दिले होते. वॉरंट जारी केला म्हणजे अदानीला लगेच अटक होईल, असे नाही. आरोपींनी स्वेच्छेने न्यायालयात हजर राहावे यासाठी हा प्रयत्न आहे. अदानी समुहाने (Gautam Adani) हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले असून, कायदेशीर लढा देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
लाचखोरी आणि फसवणूक केल्याचा आरोप
लाचखोरी योजना: 2020 ते 2024 दरम्यान भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन पॉवर कॉन्ट्रॅक्ट्स मिळवले गेले. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, छत्तीसगड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांतील अधिकाऱ्यांना लाच देण्यात आली.
अमेरिकन गुंतवणूकदारांची दिशाभूल: अदानी ग्रीन एनर्जीने (Gautam Adani) यूएस गुंतवणूकदारांकडून $750 दशलक्ष जमा केले. लाचखोरीची माहिती गुंतवणूकदारांपासून लपवण्यात आल्याचा आरोप अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला आहे.
Azure Power ची भूमिका: Azure Power या भारतीय सौर ऊर्जा कंपनीनेही लाचखोरी योजनेत भाग घेतला होता. न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर Azure चे व्यवहार झाले.