आल्याचा चहा बनवण्याची खास पद्धतPudhari
Published on
:
29 Nov 2024, 12:53 pm
Updated on
:
29 Nov 2024, 12:53 pm
हुडहुडी भरवणारी थंडी आता कुठे सुरू झाली आहे. या दिवसात जवळपास सगळ्यांचेच चहाप्रेम उफाळून येते. खरं तर भारतासारख्या चहा हे राष्ट्रीय पेय असलेल्या देशात आल्याचा चहा हे अत्यंत लाडकं पेय आहे. मुसळधार पाऊस पडो किंवा कडक थंडी आल्याचा चहा हा हवाच. पण आल्याचा चहा बनवण्याचीही एक खास पद्धत आहे. तुम्हाला माहिती आहे का चहात आलं टाकायची योग्य वेळ कोणती ?
जर चहा उकळताना योग्यवेळी आलं टाकल्यास त्याची चव तर सुधारतेच याशिवाय त्यातील आरोग्यदायी घटकातही वाढ होते.
चहा उकळायला ठेवल्यावर त्यात आलं टाकावं कि त्यात दूध टाकल्यावर टाकावं याबाबत अनेकांचा गोंधळ असतो. पण तुम्हाला माहिती आहे का ? चहाला एक उकळी आल्याशिवाय आलं टाकू नये. चहाच्या मिश्रणात चहा पावडर, साखर आणि पाणी घालून एक उकळी काढावी त्यानंतर त्यात दूध घालावं. त्यानंतर चहात आलं टाकावं. आलं टाकताना ते खलबत्त्यात किंवा इतक कोणत्याही पृष्ठभागावर ठेचून टाकू नये. कारण यातील बराच रस भांड्याच्या आतील किंवा बाहेरील बाजूला लागतो.
तर याऐवजी चहात आलं घालताना कायम खिसून घालावं यामुळे आल्याचा रस अजिबात वाया जात नाही तसेच त्याला विशिष्ट असा फ्लेवर येतो.