जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचा इशारा
हिंगोली (Hingoli Assembly Election Result) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आदर्श आचार संहिता अंमलात आहे. उद्या 23 नोव्हेंबरला जिल्ह्यातील हिंगोली वसमत आणि कळमनुरी विधानसभा मतदार संघात मतमोजणी होणार आहे. त्यामुळे कोणीही विनापरवाना मिरवणूक काढल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर होणार आहे. (Assembly Election Result) निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे प्रसारित करू नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे वाजवणार नाहीत तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये.
व्हाट्सअप ग्रुपचे एडमिन यांनी आजपासून त्यांच्या मोबाईल फोन मधील ग्रुपच्या सेटिंग मध्ये Only Admin Can Send Message बदल करून घ्यावा जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाहीत जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काहीं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप एडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे.