Hingoli District Court: दिव्यांग पक्षकाराला भेटण्यासाठी न्यायाधीशांनी चक्क वाहन गाठले

2 hours ago 1

महालोक अदालतीत मोटार अपघाताचे ३० प्रकरणे निकाली

हिंगोली (Hingoli District Court) : येथील जिल्हा सत्र न्यायालयात शनीवारी २८ सप्टेंबरला महालोक अदालत घेण्यात आली. यामध्ये मोटार अपघाताचे ३० प्रकरणे निकाली काढली. तर जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.व्ही.लोखंडे यांनी दालन सोडुन पक्षकाराला भेटण्यासाठी चक्क वाहन गाठून न्याय दिला. दरम्यान येथील (Hingoli District Court) जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी २८ सप्टेंबर रोजी महालोकअदालत घेण्यात आली. मोटार अपघात यासह भूसंपादन, फौजदारी प्रकरणे, दिवाणी, वैवाहिक, कौटुंबिक वाद, नगर पालिका, विज वितरण कंपनी, बँक, असे २३८ प्रकरणे तडजोडी अंती निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली होती.

दरम्यान, या लोक अदालतीत अ‍ॅड. सुरेश गडदे यांचे दिव्यांग असलेल्या पक्षकार पूजा पोतदार या नुकसान भरपाई मिळण्यासाठी यापूर्वी (Hingoli District Court) न्यायालयात दावा दाखल केला होता. ४ नोव्हेंबर २०१९ मध्ये पूजा हीचा अपघात झाला होता. या अपघातात पूजा यांचा उजवा पाय निकामी झाला. त्यामुळे ती लोक अदालतीत हजेरी लावली होती; मात्र तीला जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.व्ही.लोखंडे यांच्या दालनापर्यंत जाता येत नसल्याने स्वतः जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.व्ही.लोखंडे यांनी न्यायासनावरून खाली उतरून थेट दिव्यांग पूजा हिच्या गाडी पर्यंत आले. अन् त्यांना न्याय दिला.

या लोक अदालतीत अ‍ॅड. सुरेश गडदे यांची मोटार अपघाताची एकूण २२ प्रकरणे दाखल केली होती. २२ प्रकरणे निकाली काढली आहेत. तर एकूण मोटार अपघाताची तीस प्रकरणे दाखल करण्यात आली होती. तर पूजा पोतदार हीचा २० लाखांचा दावा न्याशनल इन्शुरन्स कंपनीचे अ‍ॅड. अजय व्यास यांनी मंजूर केला आहे. यावेळी (Hingoli District Court) जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.व्ही.लोखंडे, देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. सुरेश गडदे यांच्या मोटार अपघाताच्या वीस लाखांच्या दाव्यास मंजूरी मिळाली आहे. या लोक अदालतीत अ‍ॅड. विपीन अर्धापूरकर, अ‍ॅड. मनीषा गडदे , अ‍ॅड. कानबाराव मस्के, अ‍ॅड. लेकुळे,अ‍ॅड.शेख मुद्दसीर, अ‍ॅड.सचिन पोले आदींनी सहकार्य केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article