Hingoli People Court: लोकन्यायालयामध्ये तब्बल 2 कोटी 35 लाख 48 हजार 175 रुपयांची प्रकरणे निकाली

2 hours ago 1

हिंगोली (Hingoli People Court) : तालुका विधी सेवा समिती, हिंगोली यांनी सर्वोच्च न्यायालय तसेच मा. उच्च न्यायालय मुंबई आणि मा. जिल्हा न्यायालय, परभणी तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयामध्ये दिनांक 28 सप्टेंबर रोजी (Hingoli People Court) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबीत असलेली 1130 प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी व विविध बँका यांची वाद दाखलपुर्व 3090 प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालती मध्ये ठेवण्यात आली होती.

त्यामध्ये सदरील लोकअदालतीमध्ये प्रलंबित 108 व वाद दाखलपुर्व 20 प्रकरणे निकाली काढण्यात आली. एकूण 128 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या (Hingoli People Court) लोकन्यायालयात प्रलंबित व दाखलपुर्व प्रकरणात एकुण तब्बल 2 कोटी 35 लाख 48 हजार 175 रुपयांची तडजोडी आधारे रक्कम ठरविण्यात आली व प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालया साठी हिंगोली येथील न्यायीक अधिकारी तसेच विधीज्ञ समाविष्ठ असलेले एकुण पाच पॅनल करण्यात आले होते.

सदर लोकअदालतमध्ये आर.व्ही. लोखंडे, जिल्हा न्यायाधीश-1, हिंगोली तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, हिंगोली यांच्या मार्गदर्शनानुसार आर.व्ही. लोखंडे, जिल्हा न्यायाधीश-1 हिंगोली, पी.जी. देशमुख, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-1 हिंगोली, श्रीमती. व्ही. व्ही. सावरकर, सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, हिंगोली, य.जे. ठाकरे, 2 रे सह दिवाणी न्यायाधीश कस्तर, हिंगोली, श्रीमती.पी.आर. पमनानी, उरे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, हिंगोली यांनी पॅनल प्रमुख म्हणुन काम केले. सदर (Hingoli People Court) लोकअदालतीला वकीलसंघाचे अध्यक्ष अँड. शिवशंकर वाबळे उमरेकर, वकील संघाचे सचिव अँड. अजय वानखेडे व सर्व वकील सभासद, न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article