Hingoli Woman Assault: जिल्ह्यात एका तरूणीसह महिलेवर अत्याचार

2 hours ago 1

हिंगोली शहर व हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली (Hingoli Woman Assault) : जिल्ह्यात एका तरूणीसह महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी (Woman Assault) हिंगोली शहर व हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील एका गावातील २४ वर्षीय महिला गृहरक्षक दलाच्या भरतीची तयारी करीत असताना भरतीसाठी गावालगतच ती मैदानी चाचणीचा सराव करत होती. मालसेलू येथील अक्षय सोनुने या तरूणाने तिच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केला; परंतु तिने दाद दिली नसल्याने तू माझ्याशी मैत्री कर अन्यथा मी माझ्या जिवाचे बरेवाईट करेन नाही तर तुझ्या पतीचे बरेवाईट करेन, अशी धमकी देऊन महिलेसोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केला.

ही महिला घरामध्ये एकटी असल्याचे पाहून अक्षयने तिच्यावर अत्याचार करून हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुझ्यासह पतीला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने ही (Woman Assault) घटना कुटुंबियांना सांगताच तिच्यासह कुटुंबियांनी हिंगोली ग्रामीण पोलिसात धाव घेऊन रितसर तक्रार दिली. त्यावरून अक्षय सोनुने याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक शालिनी नाईक, पोलिस उपनिरीक्षक राहूल घुले, पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, जमादार आकाश पंडितकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट घेऊन आरोपीची शोध मोहीम सुरू केली.

तसेच दुसर्‍या घटनेत हिंगोली शहरातील एका २३ वर्षीय तरूणीच्या (Woman Assault) घराचे बांधकाम सुरू असताना या कामावर आजम कॉलनी भागातील आहेद उर्फ आदू बेग मिर्झा (२६) हा कामासाठी येत होता. त्याने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून मी तुझ्यासोबत लग्न करणार असे म्हणून पळवून नेले. ३ जुलै ते २१ सप्टेंबर या कालावधीत हिंगोलीतील आजम कॉलनी व वसमत शहरातील जुम्मापेठ भागात त्याच्या घरी नेवून तरूणीवर अत्याचार केला. यामुळे सदर तरूणी गर्भवती राहिल्याने तिने आहेद उर्फ आदू याच्याकडे लग्नाची मागणी केली; परंतु त्याने लग्न करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर तरूणीला गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला.

त्यामुळे या प्रकाराची माहिती तरूणीने कुटुंबियांना दिल्यावर २७ सप्टेंबर रोजी त्यांनी (Hingoli Woman Assault) हिंगोली शहर ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने आहेद उर्फ आदू बेग मिर्झा याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात, पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, पोलिस उपनिरीक्षक गंधकवाड, अशोक धामणे, संजय मार्वेâ यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर आरोपीच्या अटकेकरीता पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

हिंगोली शहर व हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत एका तरूणीसह (Hingoli Woman Assault) महिलेवर अत्याचाराची घटना घडली. यातील आरोपी फरार असल्याने त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article