हिंगोली(Hingoli):- इनस्पेक्टर राज, गुंतागुंतीचे नवीन नवीन कायदे यामुळे त्रस्त असलेल्या थेट गाव पातळीवरील व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याकरिता व्यापारी महासंघ कटिबद्ध असून देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची एकमेव असलेली कॉन्फेडर्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेच्या माध्यमातून केंद्र शासनाचे (Central Govt)अनेक कायदे व्यापाऱ्यांना कसे फायदेशीर ठरतील. याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहे.
नवीन कायदे यामुळे त्रस्त असलेल्या थेट गाव पातळीवरील व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याकरिता व्यापारी महासंघ कटिबद्ध
प्रत्येक गाव ते शहर पातळीपर्यंत व्यापारी क्षेत्रात महिलांचा जो सहभाग वाढत आहे त्यांना प्रशिक्षित करून व्यवसाय वाढीकरता प्रयत्न करण्याचे काम होत असल्याचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष हस्तीमल बंब यांनी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने आयोजित संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विचार व्यक्त केले. तसेच हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाने व्यापाऱ्या करीता केलेल्या व करीत असलेल्या कामांचा बद्दल गौरवौद्गार काढले. कॉन्फिड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष हस्तीमलजी बंब यांच्या सोबत मराठवाडा विभागीय सचिव सुखदेव बजाज, मराठवाडा विभागीय महिला अध्यक्ष सौ. सिता मोहिते पाटील, सचिव सौ. आनंदी अय्यर, गोविंदजी साकला ,रामजी मोहिते कॅटचे राज्य उपाध्यक्ष अनिल नैनवाणी, हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मराठवाडा स्तरावरील संघटनेच्या कार्याचा आढावा सादर
सुखदेव जी बजाज यांनी मराठवाडा स्तरावरील संघटनेच्या कार्याचा आढावा सादर केला तर सौ. सिता मोहिते पाटील यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करून महिलांनी व्यवसाय व्यापारात उतरणे महत्त्वाचे असून ज्यामुळे व्यवसाय वृद्धी होऊन कुटुंबाच्या उत्पन्नाचे स्त्रोत पण वाढणार असून महिलांना यातून सन्मानाचे स्थान पण मिळणार असल्यामुळे महिलांनी या क्षेत्रामध्ये धाडसीने व चिकाटीने काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सौ. शीतल बालाप्रसाद तापडिया यांची हिंगोली जिल्हा महिला व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
याच कार्यक्रमात हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या ज्यात प्रशांत सोनी गोल्डी सेठ, राजेश बगडीया यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून , रवींद्र सोनी यांची जिल्हा सचिव, ओम नैनवाणी जिल्हा सहसचिव , पवन राठी व रजनीश पुरोहित यांची हिंगोली शहर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच हिंगोली जिल्ह्यातील व्यवसाय व्यापारात असणाऱ्या महिलांच्या संघटनाची बांधणी करण्याचे ठरले असून हिंगोली येथील सौ. शीतल बालाप्रसाद तापडिया यांची हिंगोली जिल्हा महिला व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
व्यापारी संवाद कार्यक्रमात प्रामुख्याने दिलीप चव्हाण, सुरेश आप्पा सराफ , गजेंद्र बियाणी, जगजीतराज खुराणा, दिपक सावजी, मधुर भन्साळी, सेनगाव तालुका अध्यक्ष राजकुमार देशमुख, सचिव निलेश जैन , हिंगोली तालुका अध्यक्ष संजय देवडा, कळमनुरी तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत देशमुख, माबूत बागवान, सुभाष तापडिया , तन्वीर नाईक, शुभम मुंदडा ,आनंद चौधरी, सुमीत चांडक, कार्तीक चांडक, अंकित बगडीया, सागर दुबे, जुबेर मामू यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.