जाणून घ्या तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? | File Photo
Published on
:
20 Nov 2024, 12:30 am
Updated on
:
20 Nov 2024, 12:30 am
Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
मेष : मालमत्तेबाबत झालेली चर्चा लाभदायक ठरेल
मेष File Photo
मेष : आज जवळच्या नातेवाईकाशी मालमत्तेबाबत झालेली चर्चा लाभदायक ठरेल. गरजूंना आर्थिक मदत केल्याने मनशांती लाभेल. जुन्या नकारात्मक गोष्टींना वरचढ होऊ देऊ नका. मुलांशी मैत्रीपूर्ण वागा. राजकीय आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला आणि मदत तुमच्या व्यवसायाला नवी दिशा देईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील.
वृषभ : रागामुळे परिस्थिती बिघडू शकते
वृषभFile Photo
वृषभ : मागील काही दिवसांतील तुमच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा आज फायदा होणार आहे. कौटुंबिक समस्येवर योग्य उपाय शोधाल. नातेवाईकांशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. प्रत्येक समस्या अतिशय कुशलतेने सोडवा. रागामुळे परिस्थिती बिघडू शकते. कार्यक्षेत्र सुधारण्यासाठी अधिक चिंतनाची गरज आहे. अतिकामामुळे थकवा जाणवेल.
मिथुन : मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची वेळ
मिथुनFile Photo
मिथुन : आज तुम्हाला फोनवरून चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्यातही रुची वाढेल. इतरांचा सल्ला तुम्हाला गोंधळात टाकू शकतो. तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची वेळ आली आहे. पती-पत्नी एकमेकांचा आदर करतील. तुमची जीवनशैली तुम्हाला निरोगी ठेवेल.
कर्क : आज आर्थिक स्थिती चांगली राहील
कर्कFile Photo
कर्क : आज आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही तुमच्या कर्माप्रती पूर्णपणे समर्पित राहा. भावंडांसोबतचे तुमचे नाते व्यवस्थित सांभाळा. नकळत मतभेदाची स्थिती निर्माण होऊ शकते. जवळच्या नातेवाईकाला आर्थिक मदत करावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुमची उपस्थिती आवश्यक असेल. जोडीदाराचे आणि कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य लाभेल.
सिंह : तणावातून मुक्ती मिळू शकते
सिंहFile Photo
सिंह : कोणताही महत्त्वाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. संकटात जवळच्या नातेवाईकांचे सहकार्य तुमचे मनोबल मजबूत ठेवेल. तणावातून मुक्ती मिळू शकते. नकारात्मक कामात सहभागी होणार्यांच्या संपर्कात राहू नका. आरोग्य चांगले राहील.
कन्या : असंतुलित आहाराचा प्रकृतीवर नकारात्मक परिणाम होईल
कन्याFile Photo
कन्या : आजचा दिवस व्यस्त असू शकतो. विचलित न होता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. ग्रहस्थिती अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना योग्य निकाल मिळू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींमुळे विचलित होऊ नका. सर्जनशील क्रियाकलापांमध्येही थोडा वेळ व्यतित करा. मनःस्थितीवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. कौटुंबिक आणि व्यावसायिक व्यवहारात योग्य समन्वय ठेवा. असंतुलित आहाराचा प्रकृतीवर नकारात्मक परिणाम होईल.
तूळ : विशेष कामासाठी आजचा काळ उत्तम आहे
तूळ File Photo
तूळ : विशेष कामासाठी आजचा काळ उत्तम आहे. ज्येष्ठांचा अनुभव तुम्हाला नवी दिशा देवू शकतो. मुलांकडून समाधानकारक बातमी मिळू शकते. बाहेरील व्यक्ती तुमच्या घरातील शांतता भंग करू शकते, याची जाणीव ठेवा. आर्थिक स्थिती सामान्य राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहू शकते.
वृश्चिक : आत्मविश्वासने सर्व कामे पूर्ण कराल
वृश्चिकFile Photo
वृश्चिक : आज तुम्ही आत्मविश्वासने सर्व कामे पूर्ण कराल. विरोधक नमते घेतील. जवळच्या नातेवाईक आणि मित्रांसोबत वेळ व्यतित कराल. महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. एखादी लाभदायक संधी हातातून निसटू शकते याची जाणीव ठेवा. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान करा.
धनु : पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन मतभेद होवू शकतात
धनुFile Photo
धनु : आज जवळच्या नातेवाईकाशी काही काळापासून सुरू असलेले गैरसमज दूर झाल्याने नात्यात गोडवा येईल. संपर्क क्षेत्रात वाढ होईल. तुमची मानसिक स्थिती सकारात्मक ठेवा. विचार न करता कुठेही गुंतवणूक करू नका. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन मतभेद होवू शकतात.
मकर : महिलांसाठी दिवस लाभदायक असेल
मकरFile Photo
मकर : आज अध्यात्मिक कार्यातील सहभागाने तुमच्या विचारातही सकारात्मक बदल होतील. महिलांसाठी दिवस लाभदायक असेल. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याचे तुमच्या धैर्य असेल. महत्त्वाच्या वस्तू आणि कागदपत्रे जतन करा. अन्यथा त्याचा गैरवापर होऊ शकतो. व्यावसायिक स्पर्धेमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवतील.
कुंभ : दीर्घकाळ चिंतेपासूनही तुम्हाला आराम मिळू शकतो
कुंभFile Photo
कुंभ : कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही सहजपणे समस्या सोडवू शकाल. दीर्घकाळ चिंतेपासूनही तुम्हाला आराम मिळू शकतो. मालमत्तेचा वाद सोडवण्यासाठी घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या. इतरांच्या कामात जास्त ढवळाढवळ करू नका. अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो. कार्यक्षेत्रात काही चढ-उतार होऊ शकतात. पती-पत्नीचे एकमेकांना सहकार्य लाभेल. आरोग्याबाबत जागरुक राहाल.
मीन : दिवसाची सुरुवात नव्या आशेने होईल
मीनFile Photo
मीन : ग्रहस्थिती उत्तम आहे. दिवसाची सुरुवात नव्या आशेने होईल. जवळच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ लागेल. तुमच्या कृतींना प्राधान्य द्या. खूप व्यस्त राहिल्याने तुमच्या स्वतःच्या कामात व्यत्यय येऊ शकतो. शेजाऱ्यांशी कोणत्याही प्रकारचा वाद टाळा. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा राहील. अति परिश्रमामुळे थकवा जाणवेल.