जाणून घ्या तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? | File Photo
Published on
:
23 Nov 2024, 11:13 am
Updated on
:
23 Nov 2024, 11:13 am
Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
मेष : आज ग्रहांचे भ्रमण तुमच्यासाठी लाभाचे द्वार उघडत आहे
मेष File Photo
मेष : आज ग्रहांचे भ्रमण तुमच्यासाठी लाभाचे द्वार उघडत आहे. फक्त योग्य परिश्रम आवश्यक आहेत. शुभचिंतकाची मदत तुम्हाला आशेचा नवा किरण दाखवेल. विद्यार्थी आणि तरुण करिअरबाबत अधिक गंभीर असतील;पण घाईगडबडीत आणि भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. व्यवसायात सुधारणा करता येईल. आहार घेताना काळजी घ्या.
वृषभ : व्यापारात ग्रहमान अनुकूल आहे
वृषभFile Photo
वृषभ : आजचा दिवस संमिश्र आहे. दिवसाची सुरुवात चांगली होईल. समविचारी लोकांच्या भेटीमुळे नवीन ऊर्जा मिळेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. आर्थिक प्रश्न संयमाने हाताळल्यास समस्येवर मात कराल. सामाजिक उपक्रमातही तुमचा सहभाग असेल. व्यापारात ग्रहमान अनुकूल आहे. पती-पत्नीचे नाते मधूर होईल. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील.
मिथुन : आज सकारात्मक विचारांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल
मिथुनFile Photo
मिथुन : आज सकारात्मक विचारांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. घरामध्ये योग्य व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्नही यशस्वी होतील. इतरांच्या कामांत अति हस्तक्षेप टाळा. प्रवासात त्रास संभवतो. कौटुंबिक आणि व्यावसायिक कामात योग्य समन्वय राखला. रक्तदाब आणि मधुमेह असणार्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.
कर्क : आर्थिक पातळीवर यशस्वी व्हाल
कर्कFile Photo
कर्क : आजच्या दिवसाची सुरुवात एखाद्या सुखद प्रसंगाने होऊ शकते. आर्थिक पातळीवर यशस्वी व्हाल. मित्र किंवा सहकाऱ्यांसोबत झालेल्या संवाद लाभदायक ठरेल. दिवसाच्या उत्तरार्धात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुमच्यासमोर अचानक एखादी समस्या उद्भवू शकते. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील; परंतु त्याच वेळी खर्चाचे प्रमाणही अधिक असेल. कार्यक्षेत्रातील कामाचा ताण जाणवेल. वैवाहिक जीवनात काही गैरसमज होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील.
सिंह : राहणीमान सुधारण्यासाठी तुमचा व्यापक दृष्टीकोन असेल
सिंहFile Photo
सिंह : आज अनुभवी आणि ज्येष्ठ सदस्यांचे आशीर्वाद आणि सहकार्य लाभेल. राहणीमान सुधारण्यासाठी तुमचा व्यापक दृष्टीकोन असेल. आवडत्या कामांत वेळ व्यतित केल्याने तुम्हाला मनशांती लाभेल. दुपारी काही नकारात्मक विचार मनात येऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. चुकीच्या गोष्टींवर खर्च होणार नाही याची काळजी घ्या. पती-पत्नीच्या नात्यात काही वाद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : विवाहित व्यक्तींचे सासरच्या लोकांशी मतभेद होऊ शकतात
कन्याFile Photo
कन्या : आज तुमच्या कल्पकतेमधून यश मिळवाल. घरातील सुखसोयींशी संबंधित कामातही तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. विवाहित व्यक्तींचे सासरच्या लोकांशी मतभेद होऊ शकतात. अतिकामामुळे चिडचिड होऊ शकते. घरातील वडीलधाऱ्यांच्या तब्येतीबाबत जागरुक राहा. वैयक्तिक कारणांमुळे व्यवसायावर लक्ष केंद्रित करता येणार नाही. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल. शारीरिक थकवा जाणवेल.
तूळ : अति उदार दृष्टीकोन त्रासदायक ठरेल
तूळ File Photo
तूळ : आज तुम्ही तुमच्या कार्याप्रती समर्पित व्हाल. नवीन योजना मनात येतील जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने तुम्ही त्या योजना सुरू करू शकाल. अति उदार दृष्टीकोन त्रासदायक ठरेल. व्यावहारिक दृष्टीकोन ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा नुकसान होवू शकते. वैवाहिक संबंध मधुर ठेवण्यासाठी तुमचे विशेष योगदान असेल.
वृश्चिक : तुमचे सर्व लक्ष आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर असेल
वृश्चिकFile Photo
वृश्चिक : आज तुमचे सर्व लक्ष आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर असेल. त्यासंबंधित काही महत्त्वाच्या योजनाही असतील. मित्रांसोबत निष्कारण वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. हा मेहनतीचा काळ आहे. खर्च बजेटपेक्षा जास्त होणार नाही याची जाणीव ठेवा. कार्यक्षेत्रावर पूर्ण लक्ष केंद्रित करा.
धनु : इतरांच्या समस्यांचे निराकरण करण्यात तुमची मदत होईल
धनुFile Photo
धनु : आज तुम्ही एखादे विशेष कार्य पूर्ण करू शकाल. घरातील वातावरणही व्यवस्थित राहील. इतरांच्या समस्यांचे निराकरण करण्यात तुमची मदत होईल. कोणत्याही नातेवाईकाच्या नकारात्मक बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. पैशाचे व्यवहार करताना थोडी सावधगिरी बाळगा. एखाद्या खास व्यक्तीचे सहकार्य तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल. अतिकामाचा आरोग्यावर परिणाम होईल.
मकर : आज उत्पन्न आणि खर्चात समानता असेल
मकरFile Photo
मकर : आज उत्पन्न आणि खर्चात समानता असेल. दुपारनंतर काही अडचणी येऊ शकतात; पण तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यावर उपाय शोधाल. घरातील कामातही वेळ जाईल. कामाच्या ठिकाणचे सकारात्मक वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत जोडीदाराचे सहकार्य तुम्हाला तणावातून मुक्त करेल. पोटविकाराचा त्रास होईल.
कुंभ : जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहतील
कुंभFile Photo
कुंभ : आज तुम्ही सामाजिक किंवा राजकीय कार्यात जास्त वेळ द्याल. विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. कोणतेही गुंतवणूक धोरण घेण्यापूर्वी त्याची योग्य माहिती मिळवा. काही नकारात्मक कामांकडे तरुणांचे लक्ष वेधले जाऊ शकते. व्यावसायिक योजनेच्या यशामुळे आत्मविश्वास वाढेल. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहतील. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मीन : तणाव आज दूर होऊ शकतो
मीनFile Photo
मीन : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला तणाव आज दूर होऊ शकतो. तुम्ही दिनचर्येत केलेला बदल सकारात्मक असेल. कुटुंबासोबत आनंदाचा वेळ जाईल. संततीची काळजी राहिल. अनुभवी व्यक्तीशी चर्चा करा. व्यावसायिक कामात व्यत्यय येणार नाही. आहार घेताना काळजी घ्या.