पर्थ कसोटीमध्ये कर्णधार जसप्रीत बुमराहने घेतल्या पाच विकेट.
Published on
:
23 Nov 2024, 4:52 am
Updated on
:
23 Nov 2024, 4:52 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीच्या दुसर्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांवर गुंडाळला गेला. पहिल्या दिवशी ६७ धावांवर सात विकेट गमावल्यानंतर आज (दि.२३) ३७ धावांत उर्वरीत तीन विकेट ऑस्ट्रेलियाने गमावल्या. टीम इंडियाला दुसर्या डावात ४६ धावांची आघाडी मिळाली आहे. भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने पाच विकेट घेतल्या.
जसप्रीत बुमराहने घेतल्या पाच विकेट
ॲलेक्स कॅरीच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला आज पहिला धक्का बसला. बुमराहने त्याला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद केले. कॅरीने २१ धावा केल्या. यानंतर नॅथन लायन हा हर्षित राणाचा बळी ठरला. त्याला पाच धावा करता आल्या. भारताने पहिल्या तासातच या दोन्ही विकेट घेतल्या होत्या. मात्र, स्टार्क आणि जोश हेझलवूड या शेवटच्या जोडीला बाद करायला टीम इंडियाला एक तास लागला. स्टार्क आणि हेजलवूड यांनी 110 चेंडूत 10व्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी केली. स्टार्कने 112 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने 26 धावा केल्या. हर्षितनेच त्याला शिकार बनवले. हेजलवूड सात धावा करून नाबाद राहिला. भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने पाच विकेट घेतल्या.
पहिल्या दिवशी तब्बल १७ बळी
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. तिसऱ्याच षटकात बुमराहने नॅथन मॅकस्विनीला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला 10 धावा करता आल्या. यानंतर बुमराहने उस्मान ख्वाजाला कोहलीकरवी झेलबाद केले, त्यानंतर पुढच्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथला एलबीडब्ल्यू आऊट केले. ख्वाजाने आठ धावा केल्या तर स्मिथला खातेही उघडता आले नाही. पदार्पण वेगवान गोलंदाज हर्षित राणाला ट्रॅव्हिस हेड क्लीन बोल्ड केले. त्याला 11 धावा करता आल्या. त्याचवेळी मिचेल मार्श सहा धावा करून मोहम्मद सिराजचा बळी ठरला. त्यानंतर सिराजने लॅबुशेनला एलबीडब्ल्यू केले. त्याला 52 चेंडूत दोन धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला भारतीय कर्णधार बुमराहने पंतकरवी झेलबाद केले. त्याला तीन धावा करता आल्या. सध्या ॲलेक्स कॅरी १९ धावांवर नाबाद आहे तर मिचेल स्टार्क ४० धावांवर नाबाद आहे. बुमराहशिवाय हर्षित राणाने तीन आणि सिराजने दोन विकेट घेतल्या. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव १५० धावांवर गुंडाळला गेला.