IND vs AUS: नाथन लियोनने ऋषभ पंतला डिवचलं, सामन्यात विचारला लिलावाबाबत असा प्रश्न Watch Video

5 hours ago 1

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु असताना आयपीएल मेगा लिलावाचे वेध लागले आहेत. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आयपीएल स्पर्धेचा मेगा लिलाव पार पडणार आहे. या अनुषंगाने कसोटी सामन्यात डिवचण्याचा प्रकार पाहण्यात आला. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात स्लेजिंग होणार हे सर्वांनाच माहिती आहे. कसोटीच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार पाहायला मिळाला. पहिल्या डावात ऋषभ पंत फलंदाजी करत असताना नाथन लियोनने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. कारण एकदा का लक्ष विचलीत झालं की विकेट घेणं सोपं होतं.नाथन लियोनने ऋषभ पंत मैदानात सेट होत असल्याचं पाहिलं आणि त्याला डिवचण्यास सुरुवात केली. नाथन लियोन आयपीएल मेगा लिलावाचा भाग नाही. पण खेळाडूंचं लक्ष लिलावाकडे लागलं आहे सर्वांना माहिती आहे. मग काय नाथन लियोनने हाच मुद्दा पकडून ऋषभ पंतला प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला ऋषभ पंतने हसत उत्तर दिलं.

नाथन लियोनने विचारलेला प्रश्न आणि पंतचं उत्तर स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं आहे. लियोनने विचारलं की, आयपीएल लिलावानंतर कोणत्या टीमसोबत जाणार? पंतने हसतच त्याला उत्तर दिलं की मला माहिती नाही. दिल्ली कॅपिटल्सने विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला रिलीज केलं आहे. त्यामुळे मेगा लिलावात त्याच्यावर नजरा खिळल्या आहेत. त्याच्यासाठी मोठी बोली लागणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

IPL AUCTION TALK IN BGT 😄🔥

Nathan Lyon – “Where are you going successful the IPL auction”?

Rishabh Pant – “No Idea”. pic.twitter.com/qbpQ2movED

— Johns. (@CricCrazyJohns) November 22, 2024

मागच्या पर्वात ऋषभ पंतने जबरदस्त खेळी केली होती. तसेच त्याचा फॉर्मही कायम आहे. त्यामुळे मेगा लिलावात ऋषभ पंत आजवरचे सर्वच विक्रम मोडीत काढेल असं सांगण्यात येत आहे. आयपीएलमध्ये मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यासाठी मागच्या 24.75 कोटी मोजले होते. मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबरला पार पडणार आहे. पहिल्या सेटमध्ये ऋषभ पंत आहे. त्यामुळे पहिल्याच सेटमध्ये छप्परतोड बोली लागेल असा अंदाज आहे. आता ऋषभ पंतसाठी किती बोली लागते हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article