Ind Vs Ban 2nd Test – कानपूर कसोटीमध्ये बांगलादेशच्या क्रिकेटप्रेमीला मारहाण, रुग्णालयात दाखल

2 hours ago 1

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये कानपुरमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. सामना सुरू असतानाच एका बांगलादेशच्या क्रिकेटप्रेमीला बेदम मारहाणा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवसाचा खेळ 35 षटकांमध्ये संपुष्टात आला. बांगलादेशने तीन विकेट गमावत 107 धावा केल्या आहेत. मात्र सामना सुरू असताना एका बांगलादेशी चाहत्याला मारहाण करण्यात आल्यामुळे काही काळ स्टेडियमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. तो ‘रॉबी टायगर’ या नावाने प्रचलित असून बांगलादेशचा मोठा चाहता आहे. आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी तो कानपुरमध्ये दाखल झाला होता.

Ind Vs Ban 2nd Test – कानपूर कसोटीला पावसामुळे ब्रेक, बांगलादेशने बनवल्या 107 धावा

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशला सपोर्ट करण्यासाठी तो देशाचा झेंडा फडकावत घोषणा देत होता. याच दरम्यान हिंदुस्थानी चाहत्यांची आणि त्याचा वाद झाला. पुढे वादाच रुपांतर भांडणांमध्ये आणि भांडणांच रुपांतर हाणामारीत झालं. त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला होता. सुरक्षारक्षकांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. सदर घटना लंच ब्रेक दरम्यान घडली आहे.

#WATCH | Kanpur, Uttar Pradesh: Bangladesh cricket team supporter Ravi, who was admitted to hospital after his health deteriorated during India-Bangladesh second test match, says, “My health deteriorated and police brought me to the hospital and I am being treated…”

(Source:… https://t.co/M8TlCd4fNw pic.twitter.com/XMXo4Rjw1Q

— ANI (@ANI) September 27, 2024

माझ्या कंबरेला आणि पाठीला दुखापत झाल्याचे, बांगलादेशी चाहत्याने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. मात्र स्टेडियमध्ये उपस्थित पोलिसांनी त्याला मारहाण झाली नसल्याचे सांगितले आहे. उष्णतेमुळे आणि डिहायड्रेशनमुळे त्याला त्रास झाल्याचे, पोलिसांची म्हणणे आहे. अधिक तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू असून मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर सर्व माहिती समोर येईल असं पोलीस म्हणाले आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article