IPL Mega Auction 2025 : 577 खेळाडूंवर बोली लागणार, कोणत्या टीमकडे किती रक्कम? जाणून घ्या

2 hours ago 1

आयपीएल मेगा ऑक्शन 2025 चं काउंटडाउन सुरु झालं आहे. मेगा ऑक्शन सुरु होण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. मेगा ऑक्शन 23 आणि 24 नोव्हेंबरला सौदी अरेबिया येथील जेद्दाह शहरात होणार आहे. मेगा ऑक्शनला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मेगा ऑक्शन लाईव्ह मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल. तर टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर मेगा ऑक्शन पाहता येईल.

ऑक्शनमध्ये3 कर्णधार

आयपीएल मेगा ऑक्शन 2025 आधी सर्व 10 फ्रँचायजींनी त्यांच्या रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली. त्यापैकी केकेआर, दिल्ली कॅपिट्ल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या 3 संघांनी खेळाडूंसह कर्णधारांनाही करारमुक्त केलं. त्यामुळे ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे 3 माजी कर्णधार मेगा ऑक्शनमध्ये त्यांचं भाग्य आजमवणार आहेत. या मेगा ऑक्शनसाठीच्या 2 मॉर्की लिस्टमध्ये प्रत्येकी 6-6 खेळाडूंची नावं आहेत. पहिल्या यादीत ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, जोस बटलर, अर्शदीप सिंह, कगिसो रबाडा आणि मिचेल स्टार्क यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या यादीत केएल राहुल, युझवेंद्र चहल, लियाम लिविंगस्टोन, डेव्हिड मिलर, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांची नावं आहेत.

या मेगा ऑक्शनसाठी 1 हजार 577 मधून फक्त 577 खेळाडूंची निवड करण्यात आली आहेत. या 577 जणांमध्ये 367 भारतीय तर 210 परदेशी खेळाडू आहेत. तर एकूण 10 संघांना फक्त 204 खेळाडूंची गरज आहे. अशात आता 577 मधून कोणते 204 खेळाडू भाग्यवान ठरतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

हे सुद्धा वाचा

बेस प्राईज किती?

नेहमीप्रमाणे यंदाही 2 कोटी ही सर्वाधिक बेस प्राईज आहे. या ऑक्शनमध्ये 81 खेळाडूंनी त्यांची बेस प्राईज ही 2 कोटी निश्चिक केली आहे. तर यंदा किमान बेस प्राईज ही 30 लाख रुपये आहे. याआधी बेस प्राईज 20 लाख रुपये होती.

अशी होणार ऑक्शनला सुरुवात?

ऑक्शनमध्ये स्टार खेळाडूंवर लक्ष असणार आहेत. या ऑक्शनमध्ये अनेक स्टार खेळाडू आहेत. मात्र त्यातही निवडक असे 12 खेळाडू आहेत. या 12 खेळाडूंना 6-6 च्या 2 मॉर्की प्लेअर लिस्टमध्ये ठेवण्यात आलं आहे. या मॉर्की प्लेअर लिस्टमधील खेळाडूंपासून ऑक्शनला सुरुवात होणार आहे. त्यानंतर कॅप्ड खेळाडूंच्या पहिल्या फेरीला सुरुवात होईल. या कॅप्ड खेळाडूंना फलंदाज, वेगवान गोलंदाज, विकेटकीपर, स्पिनर आणि ऑलराउंडर यानुसार विभागण्यात आलं आहे.

सर्वच खेळाडूंच्या नावांचा उल्लेख नाही

आता या मेगा ऑक्शनमधील 577 खेळाडूंमधील प्रत्येकाचं नाव घेतलं जाणार नाही. या 577 पैकी 117 खेळाडूंचीच एक एक करुन नावं घेतली जाणार आहेत. त्यांनतर 118 व्या खेळाडूपासून एक्सीलेरेशन राउंडला सुरुवात होईल. आयपीएलकडून आधी 574 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यानंतर अचानक जोफ्रा आर्चर याच्यासह 3 खेळाडूंची नावं जोडली गेली.

दरम्यान मेगा ऑक्शनसाठी प्रत्येक संघाला 120 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं निश्चित झालं होतं. मात्र रिटेन्शनमध्ये 10 पैकी काही संघांनी काही खेळाडूंना रिटेन केलं होतं. त्यामुळे रिटेन्शनंतर कोणत्या संघाकडे ऑक्शनसाठी किती रक्कम बाकी आहे? हे जाणून घेऊयात.

  • पंजाब किंग्सकडे सर्वाधिक 110.50 कोटी रक्कम आहे. पंजाबने आपल्या गोटात खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी सर्वात कमी 9 कोटी 50 लाख रुपये खर्च केले.
  • सनरायजर्स हैदराबादने रिटेन्शमध्ये 75 कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे त्यांच्याकडे 45 कोटी रुपयांची रक्कम बाकी आहे.
  • मुंबई इंडियन्सकडे 45 कोटी रक्कम बाकी आहे. पलटणने रिटेन्शमध्ये 75 कोटी रुपये खर्च केले.
  • लखनऊ सुपर जायंट्सकडे 69 कोटी रुपये आहेत. त्यांनी रिटेन्शमध्ये 51 कोटी रुपये खर्चे केले.
  • राजस्थान रॉयल्सने 79 कोटी रुपये खेळाडूंना कायम राखण्यासाठी खर्च केले. त्यामुळे राजस्थनकडे 41 कोटी रुपये आहेत.
  • चेन्नई सुपर किंग्सने रिटेन्शनमध्ये 55 कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे सीएसकेकडे 65 कोटी उपलब्ध आहेत.
  • कोलकाता नाईट रायडर्सने रिटेन्शनमध्ये 69 कोटी खर्च केले. त्यामुळे त्यांच्या खात्यात आता 51 कोटी इतकी रक्कम आहे.
  • गुजरात टायटन्सकडे 69 कोटी शिल्लक आहेत. त्यांनी 51 कोटी रुपये रिटेन्शमध्ये खर्च केले.
  • दिल्ली कॅपिट्ल्सकडे 73 कोटी रुपये बाकी आहेत. त्यांनी 47 कोटी रिटेन्शमध्ये खर्च केले.
  • आरसीबीकडे 83 कोटी रुपये आहेत. आरसीबीने रिटेन्शमध्ये 37 कोटी खर्च केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article