NOTA Option In VotingPudhari News network
Published on
:
29 Nov 2024, 9:38 am
Updated on
:
29 Nov 2024, 9:38 am
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा क्षेत्रातील 139 उमेदवारांना 15 हजार 783 मतदारांनी नोटांचा वापर करून त्यांना नाकारले आहे. यामध्ये चोपडा व जामनेर यामध्ये सर्वाधिक नोटाचा वापर करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रांमध्ये युतीच्या उमेदवारांनी विजयाचा झेंडा रोवला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यात आघाडीचे स्वप्न खाक झाले आहे. याच अकरा विधानसभा क्षेत्रामध्ये नोटांचाही मतदारांनी वापर केलेला आहे. सर्वाधिक नोटाचा कमी वापर हा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात झालेला आहे. या क्षेत्रात 656 मतदाराने या विधानसभा क्षेत्रात उभे असलेल्या राजकीय व पक्ष उमेदवारांना नाकारले आहे.
सर्वाधिक मतदान होऊन विधी झालेल्या जळगाव शहरांमध्ये 1096 मतदारांनी उमेदवारांना नाकारलेले आहे. तर जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वाधिक 2420 मतदारांनी नोटाचा वापर करून उमेदवारांना नाकारले तर त्यानंतर जामनेर विधानसभा क्षेत्रामध्ये 2142 मतदारांनी नाकारले आहे.
मुक्ताईनगर 656
जळगाव शहर 1096
अमळनेर 132
रावेर 1477
एरोडल 1509
भुसावळ 1538
जळगाव ग्रामीण 1803
चाळीसगाव 1813
जामनेर 2142
चोपडा 2420
तर जळगाव जिल्ह्यातील 15783 मतदारांनी जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मध्ये रिंगणात असलेल्या 139 राजकीय व अपक्ष उमेदवारांना नोटांचा वापर करून नाकारले आहे.