Published on
:
23 Nov 2024, 1:13 pm
Updated on
:
23 Nov 2024, 1:13 pm
आटपाडी : गोपीचंद पडळकर माणदेशातील एका डोंगराळ सदृश्य खेड्यातील सर्वसामान्य कुटुंबातील युवक ते विधानसभेचा आमदार हा प्रवास लक्षवेधी आहे. तितकाच खडतर व संघर्षमय आहे. चार-पाचशे वस्तीच्या खेड्यातील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या युवकाने आपल्या कार्यपद्धती व भाषाशैलीच्या जोरावर राजकारणातला व समाजकारणातला मोठा टप्पा पार पाडला आहे.
राजकारणात प्रवेश करताच स्थानिक प्रश्नाबाबत संघर्ष करीत असतानाच तालुक्यातील प्रश्न बाबत नेटाने आवाज उठवून आपल्या आयुष्यातील संघर्षाची सुरुवातीची बीजे रोवली .हा संघर्षमय प्रवास आता विधानसभेच्या आमदारकी पर्यंत येऊन ठेपला आहे .
विशेष म्हणजे आटपाडी तालुक्यात जन्म घेऊन दुष्काळ व तालुक्याचे इतर प्रश्न बाबत संघर्ष करत असतानाच आटपाडी तालुक्यासारखेच प्रश्न असलेल्या जत सारख्या दुष्काळी तालुक्यात विधानसभेची उमेदवारी करून त्यामध्ये लक्षणीय विजय मिळवणे हे वाटते तितके सोपे काम नाही मात्र या युवकांने आपल्या नेहमीच्या तडफदार व धडाकेबाज कार्यशैलीने ही बाब घडवून आनली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या युवा नेत्याचे वक्तृत्व आणि झपाटून काम करण्याची हातोटी ओळखली. आटपाडी तालुक्यातील या धडाकेबाज युवकांला जत विधानसभेची उमेदवारी दिली. तत्पूर्वी एका समाजाचा राज्यस्तरीय नेता म्हणून आपली ओळख बनवत असतानाच भाजपाने विधान परिषदेस संधी दिली. या युवकांने त्या संधीचे सोने करीत वेगवेगळे प्रश्न सोडवत असतानाच उत्कृष्ट संसदपटू हा बहुमान ही मिळवला.
जत मध्ये भाजपने संधी देताच गोपीचंद पडळकर यांनी फडणवीस यांनी दिलेल्या संधीचे सोने केले. थेट विधानसभेच्या आमदार पदास गवसणी घातली. ही बाब लक्षणीय आहे.आता सर्वसामान्य जनतेला वेध आहेत गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळण्याचे.