Published on
:
23 Nov 2024, 8:08 am
Updated on
:
23 Nov 2024, 8:08 am
कागल; पुढारी वृत्तसेवा : कागल विधानसभा मतदारसंघातून (Kagal Election Result) अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) अकरा हजार सहाशे नऊ मतांनी विजयी झाले आहेत. २६ फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना हे मताधिक्य मिळाले असून त्यांच्या विरोधी असलेले उमेदवार शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार समरजितसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांचा पुन्हा एकदा पराभव झाला आहे.
भाजपकडून तिकीट न मिळाल्याने समरजितसिंह घाटगे यांनी बंडखोरी केली. त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत, तुतारी हाती घेतली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांनी कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रवादीतून अजित पवार यांनी बाहेर पडत भाजपला पाठिंबा दिला. यावेळी मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर मुश्रीफ यांनी शरद पवार यांच्यासोबत राहिले होते. 1999 पासून मुश्रीफ हे सातत्याने या मतदारसंघातून निवडून येत आहेत. हसन मुश्रीफ यांची ही सातवी विधानसभा निवडणूक आहे.
याआधीच्या निवडणुकांमध्ये शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्या विजयासाठी सभा घेतल्या होत्या. त्याच पवार यांनी मुश्रीफ यांना पराभूत करा म्हणून आवाहन केले आणि ते घाटगे यांच्या विजयासाठी झटले. कागल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विरूद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दुहेरी सामना झाला. पण अखेर हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली.