Kankavli Assembly constituency predetermination effect : विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल समोर येत असताना सध्या 8 फेऱ्यांची मतमोजणी झाली असून त्यामध्ये नितेश राणे हे 20 हजारपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. नितेश राणेंचा हा लीड पाहता कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाने जल्लोष करत विजयाचाच गुलाल उधळला.
कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात येत आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नितेश राणे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे संदेश पारकर असे विधानसभेच्या रिंगणात आहेत. सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल समोर येत असताना सध्या 8 फेऱ्यांची मतमोजणी झाली असून त्यामध्ये नितेश राणे हे 20 हजारपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. नितेश राणेंचा हा लीड पाहता कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाने जल्लोष करत विजयाचाच गुलाल उधळला. यावेळी नितेश राणे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘कणकवली, देवगड वैभववाडीच्या जनेतेने मला तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी द्यायची हे ठरवलेलं. 262 गावात फिरताना मला ते जाणवलं. लोक मला सांगायचे, नितेश राणे तुम्ही चिंता करु नका. माझ्या मतदारसंघात माझ्या विरुद्ध जिहादींच्या माध्यमातून विषारी प्रचार केला. पण माझ्या मतदारसंघातील हिंदू समाज कडवटपणे माझ्यासोबत राहिला. महाराष्ट्रात आणि कणकवलीत भगवा जिंकला आहे. महाराष्ट्रात महायुती जिंकली, भगवाधाऱ्यांच राज्य आलं. आता कानाकोपऱ्यात अल्लाहू अकबर नाही, जय श्रीराम ऐकायला मिळणार आहे.’, असे नितेश राणे म्हणाले तर सिंधुदुर्ग जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी तिन्ही जागा आम्ही जिंकणार असा विश्वासही व्यक्त केला.
Published on: Nov 23, 2024 12:30 PM