Kurunda Gram Panchayat: ‘माझी वसुंधरा अभियान’: कुरुंदा ग्रामपंचायत सलग तिसऱ्यांदा विभागात प्रथम

2 hours ago 1

प्रथम क्रमांक बक्षीस ५० लक्ष रुपये जाहीर

कुरुंदा/हिंगोली (Kurunda Gram Panchayat) :हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा ग्रामपंचायतने (Kurunda Gram Panchayat) माझी वसुंधरा अभियान 10 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या गटातून छत्रपती संभाजी नगर विभागातून प्रथम क्रमांक पटकवला आहे. त्या बक्षीस स्वरूपाची रक्कम ५० लक्ष रुपये निधीस शासन मान्यता मिळाल्याने मंजुर झाला आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या निसर्गाशी आधारित पंचत्वावर “माझी वसुंधरा अभियान” (Mazi Vasundhara Abhiyan) हे राज्यातील स्थनिक स्वराज्य संस्था मध्ये राबविण्यास ०२ ऑक्टोबर २०२० मध्ये सुरुवात झाली.

माझी वसुंधरा अभियान ०.१ मध्ये कुरुंदा ग्रामपंचायतीस (Kurunda Gram Panchayat) सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले होते. त्यानंतर (Mazi Vasundhara Abhiyan) माझी वसुंधरा अभियान ०.२ मध्ये ७५ लक्ष रु, माझी वसुंधरा अभियान ०.३ मध्ये ७५ लक्ष रु तसेच माझी वसुंधरा अभियान ०.४ मध्ये ५० लक्ष रु उत्कृष्ट कार्य केल्या बदल सलग तीन वेळेस विभागातून प्रथम क्रमांक निवड झाली आहे. तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन मुंबई येथे गौरविण्यात आले.

कुरुंदा ग्रामपंचायतीस (Kurunda Gram Panchayat) सलग तीन वर्षे माझी वसुंधरा अभियान (Mazi Vasundhara Abhiyan) पुरस्कार छत्रपती संभाजी नगर विभागस्तर प्रथम क्रमांक

प्रथम वर्ष:- ७५ लक्ष रु
द्वितीय वर्ष:- ७५ लक्ष रु
तृतीय वर्ष:- ५० लक्ष रु

एकूण २ कोटी रुपये बक्षीस रक्कमेतून आता सुरू होणार विविध कामे ग्रामपंचायत कुरुंदा अंतर्गत असणाऱ्या ठिकाणी पर्यावरण पूरक, हरित क्षेत्र निर्माण करणे (गार्डन ), सौर ऊर्जा वापर करणे ( सोलर प्लांट ), रेन वाटर हार्वेस्टिंग करून पाण्याची बचत करणे तसेच पंच महाभूतांवर आधारित पर्यावरण संवर्धनासाठी अत्यावश्यक नेमून दिलेली कामे करणे. इत्यादी कामाचे अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय मान्यता मिळणे साठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्रालयाकडून मान्यता घेऊन लवकरच कामे सुरू करून बक्षीस रक्कम खर्च करण्यात येईल.

या पारितोषिकामुळे (Kurunda Gram Panchayat) सरपंच राजेश पाटील इंगोले, उपसरपंच वामनराव दळवी, ग्रामविकास अधिकारी रामदास पवार, सर्व सदस्य, कर्मचारी गणेश वटमे, फुलाजी इंगोले, मंगेश इंगोले, वैभव कंचले यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शन मुख्यकार्यकारी अधिकारी , गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड, सहाय्यक गटविकास अधिकारी अंभुरे, विस्तार अधिकारी तुळशीराम कोकरे, गुंडेवार , अशोक गोलेवार करत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article