लातूर (Latur):- माहिती अधिकार कायद्याची होत असलेली विडंबना थांबविणे, मुख्य माहिती आयुक्त म्हणून निवृत्त न्यायाधीश यांची नियुक्ती केली पाहिजे. तसेच माहिती अधिकार कार्यकर्त्यांना माहिती अधिकार कायद्याचे मोफत प्रशिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी माहिती अधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि.३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ रोजी साई आश्रम २ , धर्मशाळा, जुन्या कॉलेज जवळ, हेलिपॅड रोड कातोरे वस्ती, नवीन भोजनालयांच्या पाठीमागे, निमगाव, शिर्डी येथे राज्यव्यापी महा अधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष अजय तुम्मे यांनी दिली.
माहिती अधिकार संघर्ष समितीच्या वतीने या राज्यव्यापी महाअधिवेशनाचे आयोजन
या दोन दिवशीय निःशुल्क व मोफत महा अधिवेशनात सहभाग घेण्याचे आवाहन जळकोट तालुकाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी केले आहे. या अधिवेशनामध्ये माहिती अधिकार कायद्याचे संरक्षण करणे, या कायद्याबाबत जागृती वाढविणे. माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसून अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी एकत्रित येण्यासाठी व हा कायदा कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळेच माहिती अधिकार संघर्ष समितीच्या वतीने या राज्यव्यापी महाअधिवेशनाचे (Conventions) आयोजन करण्यात आले आहे. या राज्यव्यापी महा अधिवेशनासाठी उपस्थित असणाऱ्यांना निस्वार्थ जनहित संस्थेतर्फे मोफत भोजन, निवासाची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे.
अधिवेशनात उत्तम कार्यकर्त्यांना पुरस्कार आणि समितीच्या सदस्याला नियुक्तीपत्रे
या महा अधिवेशनासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून त्यांचे मार्गदर्शन देखील लाभणार आहे. कार्यक्रमासाठी राहण्याची आणि जेवणाचे सोय निस्वार्थी जनहित संस्थेतर्फे केली आहे. हा महामेळावा पूर्णपणे निःशुल्क व मोफत आहे. जो अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात एकत्रित येण्याची संधी प्रदान करतो. माहिती अधिकार संघर्ष समिती सर्व नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना या अधिवेशनात उत्तम कार्यकर्त्यांना पुरस्कार आणि समितीच्या सदस्याला नियुक्तीपत्रे व ड्रेस देण्यात येणार आहेत. माहिती अधिकार संघर्ष समितीच्या अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे माहिती अधिकार कार्यकर्ते आणि युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन माहिती अधिकार संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय तुम्मे, माहिती अधिकार कार्यकर्ते बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, जळकोट तालुका अध्यक्ष बी.जी.शिंदे अतनूरकर यांनी केले आहे