...अखेर बोरी पार्धीतील बिबट्या जेरबंदPudhari
Published on
:
19 Nov 2024, 6:07 am
Updated on
:
19 Nov 2024, 6:07 am
गेली अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर वन विभागला दौंड तालुक्यात बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे. बिबट्याने एका अडीच महिन्याच्या चिमुरड्याचा जीव घेतल्या नंतर वन विभागला ही जाग आली आहे.
या बाबत माहिती अशी की, दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथे रविवार दि.१७ रोजी सायंकाळी ४ वा.सुमारास बाळासाहेब टेंगले यांच्या उसाच्या शेतात करण मोरे हे आपल्या पत्नी सह ऊस तोडणीचे काम करीत होते. आपल्या लहान मुलाला झोळीत जोपविले होते.
याच दरम्यान बिबट्याने या झोळीत झोपविलेल्या विष्णू मोरे (वय अडीच महिने) याच्यावर हल्ला केला. यावेळी मजुरांनी बाळाला बिबट्याच्या तावडीतून सोडविले मात्र विष्णू हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.
या दरम्यान केडगाव, बोरीपार्धी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे तसेच पाळीव जनावरांवर हल्ल्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याचे ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले होते. मात्र वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.
गेल्या तीन महिन्यात एकही बिबट्या जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले नाही. हीच गोष्ट जागी असतानाच यामध्ये झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात लहान बाळाला आपला जीव गमवावा लागला असल्याने ग्रामस्थांनी वन विभागाच्या विरोधात आक्रमक पाऊले उचलली.
त्यानंतर याची दखल घेत सोमवार दि २८ रोजी वन विभागाने पिंजरा लावून बोरीपार्धी परिसरातून बिबट्या जेरबंद केला असल्याची माहिती दौंडचे वन परिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली आहे.
या बाबत माहिती देताना वन परिक्षेत्र अधिकारी राहुल काळे म्हणाले की, बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला होता. बिबट मानव संघर्ष होऊ नये या हेतूने हि खबरदारी घेण्यात आली असून मुख्य वन संरक्षक प्रादेशिक पुणे एन आर प्रवीण, उप वन संरक्षक महादेव मोहिते, वन संरक्षक अधिकारी दीपक पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली त्यांच्या मार्गदर्शना खाली ही मोहीम हाती घेत परिसरात चार पिंजरे बसविण्यात आले. बिबट्याच्या शोधासाठी थर्मल ड्रोन उडविण्यात आले.
दरम्यान सोमवारी दि.१८ रोजी वन विभागाला बिबट्या पिंजऱ्यात जेर बंद करण्यात वन विभागला यश आले असल्याची माहिती दौंड चे वन परिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद केल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मात्र ग्रामस्थांनी अजून परिसरात किती बिबट्यांचा वावर आहे या बाबत माहिती नसून यावर देखील आपण नजर ठेवावी या बाबत ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे. या मोहीम मध्ये योगिता नायकवाडी, वन रक्षक शितल मेरगळ, नचिकेत अवधाने, तोहीन सातारकर, आदित्य परांजपे यांनी सहभाग घेतला होता.