Maharashtra Assembly Elections 2024 Voting LIVE : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 पासून मतदानाला सुरूवात होणार असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहेत. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महायुती वि. महाआघाडी असा सामना रंगणार असून मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकतात याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
LIVE NEWS & UPDATES
-
20 Nov 2024 06:43 AM (IST)
Maharashtra Assembly Elections 2024 : थोड्याच वेळात मतदानाला होणार सुरूवात
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. थोड्याच वेळात सर्वत्र मतदानाला सुरूवात होणार असून निवडणूक आयोग सज्ज आहे.या निवडणुकीत महायुती-महाविकास आघाडीच्या प्रमुख 6 पक्षांमध्ये थेट टक्कर आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरूवात होणार आहे. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. आज सकाळी 7 पासून राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे की इतरांच्या मदतीने कुणाचे सरकार येणार हे लवकरच स्पष्ट होईल. त्यासाठी आज मतदार कोणाच्या पारड्यात मताचा कौल टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मतदान सुरळीत पार पडावं म्हणून निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकूण 25 हजार 696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदानाचे प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे अपडेट जाणून घेण्यासाठी दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
Published On - Nov 20,2024 6:43 AM